Lokmat Agro >शेतशिवार > आदर्श गाव हिवरेबाजारचा पाण्याचा ताळेबंद कसा मांडला जातो? वाचा सविस्तर

आदर्श गाव हिवरेबाजारचा पाण्याचा ताळेबंद कसा मांडला जातो? वाचा सविस्तर

How is the water budget of ideal village Hiware bazar presented? Read in detail | आदर्श गाव हिवरेबाजारचा पाण्याचा ताळेबंद कसा मांडला जातो? वाचा सविस्तर

आदर्श गाव हिवरेबाजारचा पाण्याचा ताळेबंद कसा मांडला जातो? वाचा सविस्तर

आदर्श गाव हिवरेबाजारने नवरात्र उत्सवानिमित्त ८ व्या माळेला गावातील मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२४-२५ चा पाण्याचा ताळेबंद मांडला.

आदर्श गाव हिवरेबाजारने नवरात्र उत्सवानिमित्त ८ व्या माळेला गावातील मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२४-२५ चा पाण्याचा ताळेबंद मांडला.

शेअर :

Join us
Join usNext

अहिल्यानगर : आदर्श गाव हिवरेबाजारने नवरात्र उत्सवानिमित्त ८ व्या माळेला गावातील मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२४-२५ चा पाण्याचा ताळेबंद मांडला. त्यात गावासाठी यंदाच्या पावसाळ्यात ४७९.६३ कोटी लिटर पाणी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

पाण्याचा ताळेबंद सादर करण्याचे हे २० वे वर्षे आहे. याप्रसंगी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, हिवरेबाजारच्या सरपंच विमलताई ठाणगे, सोसायटी अध्यक्ष छबूराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर उपस्थित होते.

पोपटराव पवार यांनी पाण्याच्या ताळेबंदाचे सविस्तर वाचन केले. ते पुढे म्हणाले की, सन १९९५ पासून हिवरे बाजार येथे पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकाचे नियोजन करण्यात येत आहे.

त्यावेळेस फक्त १ पर्जन्यमापक होते. सन २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसविल्यामुळे अचूक पाण्याचा ताळेबंद येऊ लागला.

असे आहे हिवरेबाजारचे जल अंदाजपत्रक
• २०२४-२५मध्ये गाव शिवारात पडलेला एकूण पाऊस : ४९१ मि.मी.
• पावसाचे एकूण दिवस : २४ दिवस.
• पावसाद्वारे उपलब्ध झालेले एकूण पाणी : ४७९.६३ कोटी लिटर.
• बाष्प होऊन हवेत परत जाणारे पाणी : १६७.८७ कोटी लिटर.
• वाहून जाणारे पाणी : ३८.३७ कोटी लिटर.
• जमिनीत मुरणारे पाणी : ८१.५४ कोटी लिटर.
• मातीत मुरणारे पाणी : १४३.८९ कोटी लिटर.
• जमिनीवर साठणारे पाणी : ४७.९६ कोटी लिटर.
• जलसंधारण कामामुळे मुरणारे अधिकचे पाणी : ५०.७८ कोटी लिटर.
• गावाच्या वापरासाठी उपलब्ध पाणी (जमा) : ३२४.१७ कोटी लिटर.
• गावाच्या विविध वापरासाठी वार्षिक गरज (स्वर्च) : ३२१.३५ कोटी लिटर.
• पिण्यासाठी आवश्यक पाणी (लोकसंख्या जनावरे संख्या) : ७.७१ कोटी लिटर.
• शेतीसाठी आवश्यक (खरीप रब्बी उन्हाळी बारमाही) : ३०७.१६ कोटी लिटर.
• इतर वापरासाठी आवश्यक पाणी : ६.४८ कोटी लिटर.

Web Title: How is the water budget of ideal village Hiware bazar presented? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.