Join us

हमीभाव केंद्रावर खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे खात्यावर किती दिवसात जमा होतात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:26 AM

अगोदरच मंजूर असलेल्या सहा हमीभाव खरेदी केंद्रांपैकी अवघ्या दोन ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू झाली असताना, नव्याने तीन हमीभाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीला पाठविला आहे. जिल्ह्यात अवघ्या ५७८ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे.

सोलापूर : अगोदरच मंजूर असलेल्या सहा हमीभाव खरेदी केंद्रांपैकी अवघ्या दोन ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू झाली असताना, नव्याने तीन हमीभाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीला पाठविला आहे. जिल्ह्यात अवघ्या ५७८ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे.

यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज असल्याने जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव केंद्र मंजूर करण्यात आली. १ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

बार्शी येथील हमीभाव केंद्रावर ३१७ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंद केली असून, २७ शेतकऱ्यांचे ४२३ क्विंटल, मानेगाव येथे २२६ शेतकऱ्यांची नोंद झाली, तर २६ शेतकऱ्यांची ३४४ क्विंटल सोयाबीन खरेदी केली आहे.

अक्कलकोट ३३ व पंढरपूर येथे दोन शेतकऱ्यांनी नोंद केली असली, तरी सोयाबीन खरेदी झालेली नाही. बार्शी व मानेगाव येथील केंद्रावर ७६६ क्विंटल ५० किलो सोयाबीन खरेदी झाली आहे.

वैराग, अकलूज, सोलापूरचा प्रस्तावअगोदर सहा ठिकाणी हमीभाव केंद्र मंजूर असताना, दोनच केंद्रांवर सोयाबीनची खरेदी सुरू झाली, तर दोन केंद्रांवर एकाही शेतकऱ्याने नोंद केली नाही, तर दोन केंद्रांवर ३५ शेतकयांनीच नोंद केली आहे. नव्याने वैराग, अकलूज व मुळेगाव (सोलापूर) येथे नवीन हमीभाव केंद्र मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने शासनाला पाठविला असल्याचे सांगण्यात आले.

हमीभाव केंद्रावर सोयाबीन चार हजार ८९२ रुपयांनी खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केलेल्या सोयाबीनचे आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. नोंद केलेले सोयाबीन खरेदी करण्याची जबाबदारी आमची आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर रितसर नोंद करावी. - भोसले, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

टॅग्स :सोयाबीनबाजारसोलापूरशेतकरीसरकारमार्केट यार्डराज्य सरकार