Lokmat Agro >शेतशिवार > राज्यभरात किती झालंय उसाचं गाळप? एवढे झाले साखरेचे उत्पादन

राज्यभरात किती झालंय उसाचं गाळप? एवढे झाले साखरेचे उत्पादन

How much sugarcane has been sifted, how much sugar has been produced | राज्यभरात किती झालंय उसाचं गाळप? एवढे झाले साखरेचे उत्पादन

राज्यभरात किती झालंय उसाचं गाळप? एवढे झाले साखरेचे उत्पादन

यंदा साखर कारखाने लवकर बंद होण्याच्या तयारीत आहेत.

यंदा साखर कारखाने लवकर बंद होण्याच्या तयारीत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

 पुणे : यंदा पाऊस कमी पडल्यामुळे साखर कारखाने कमी दिवस चालणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तुलनेने साखर उत्पादनही कमी होण्याची शक्यता होती पण तसं होताना दिसत नाही. सध्या उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन हे १०० लाख टनाच्या वर गेले आहे. तर यंदाचा गळीत हंगामाही अजून काही दिवस चालण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, १८ मार्च अखेरपर्यंतच्या अहावालानुसार, राज्यभरात १ हजार १२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर १ हजार २८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मागच्या वर्षी यावेळेस १ हजार ३४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून यंदाचे साखरेचे उत्पादन हे मागच्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक आहे.

राज्यभरातील विभागानुसार साखर उत्पादनाचा विचार केला तर सर्वात जास्त साखर उत्पादन हे कोल्हापूर विभागात झाले असून येथे २६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर त्यापाठोपाठ पुणे विभागात २३२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सर्वांत कमी साखरेचे उत्पादन हे नागपूर विभागात झाले असून येथे केवळ २ लाख क्विंटल उत्पादन झाले आहे. 

दरम्यान, सध्या राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले असून काही साखर कारखाने येणाऱ्या काही दिवसांत आपले गाळप थांबवणार आहेत. त्यामुळे यंदा येणाऱ्या १५ दिवसांत साखर हंगाम संपण्याची चिन्हे आहेत. तर अनेक शेतकऱ्यांचा उस अजून शेतातच असून त्यांना मजुरांची अडचण येत आहे. तर कारखान्यांकडून राहिलेला उस गाळप करण्याची तयारी सुरू आहे. 

Web Title: How much sugarcane has been sifted, how much sugar has been produced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.