Lokmat Agro >शेतशिवार > खरीप हंगामात ज्वारीचा पेरा किती; उत्पादनात घट होण्याची भीती !

खरीप हंगामात ज्वारीचा पेरा किती; उत्पादनात घट होण्याची भीती !

How much to sow sorghum in Kharif season; Fear of a decrease in production! | खरीप हंगामात ज्वारीचा पेरा किती; उत्पादनात घट होण्याची भीती !

खरीप हंगामात ज्वारीचा पेरा किती; उत्पादनात घट होण्याची भीती !

खामगाव जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र किती टक्के आहे. त्याचा उत्पादनावर काय होईल परिणाम त्याची माहिती घेऊ या. 

खामगाव जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र किती टक्के आहे. त्याचा उत्पादनावर काय होईल परिणाम त्याची माहिती घेऊ या. 

शेअर :

Join us
Join usNext

योगेश देऊळकार

खामगाव जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र १० हजार १९७ हेक्टर आहे.  यापैकी केवळ १ हजार ०५७ हेक्टर म्हणजेच केवळ १० टक्के क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे.  खरीप हंगामात ज्वारीच्या उत्पादनात सातत्याने घट - येत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे.

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून खरीप - हंगामात ज्वारी पिकासाठी पोषक वातावरण नसल्याने मोठ्या प्रमाणात - नुकसान होते.  ऐन ज्वारीची कणसे परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना पाऊस पडत असल्याने ज्वारी काळी पडून उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो.

यामुळे उत्पादन खर्चही निघणे - कठीण असल्याने शेतकरी या पिकाची - लागवड करणे टाळत आहेत. गव्हाच्या - चपातीपेक्षा ज्वारीच्या भाकरीचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी असल्याने ज्वारीच्या मागणीत वाढ झाली आहे.

या तुलनेत बाजारात ज्वारीची आवक घटल्याने दरही वधारले आहेत.सध्या चांगल्या दर्जाच्या ज्वारीला २ हजार ५०० ते २हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

खरीप हंगामात पशुपालकांकडून लागवड

* जिल्ह्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. 

* या शेतकऱ्यांना गायी, म्हशी व बैलजोडीसाठी मुबलक चाऱ्याची आवश्यकता असते. 

* यामुळे खरीप हंगामात ज्वारीचा पेरा अत्यल्प असला तरी पशुधन असलेले शेतकरी किमान एक एकर का होईना, पण ज्वारीची लागवड करीत आहेत.

उन्हाळी ज्वारीला मिळतेय पसंती !

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून उन्हाळी ज्वारीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

सिंचनाची उत्तम व्यवस्था असलेले शेतकरी या पिकाची पेरणी करीत आहेत. 

शिवाय उन्हाळ्यातील वातावरण या पिकाला पोषक असल्याने उत्पादनही भरघोस मिळत असल्याने उन्हाळी हंगामात ज्वारीच्या क्षेत्रात वाढ होत आहे.

नांदुरा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र !

नांदुरा तालुक्यात सरासरी १ हजार ८३८ पैकी ३६६ हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे. हे क्षेत्र जिल्ह्यात सर्वाधिक आहे, तर बुलढाणा तालुक्यात ज्वारीची लागवडच करण्यात आली नसल्याचे कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या पीक पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी ज्वारीला चांगला उतारा मिळतो. यामुळे गेल्या दोन वर्षापासून खरीप हंगामात ज्वारीची लागवड करणे
बंद केले आहे. - गोपाल वानखडे, शेतकरी खेर्डा बु.


एकूण क्षेत्र

सरासरी क्षेत्र१०,१९७ हेक्टर
पेरणी क्षेत्र१,०५७ हेक्टर

 

Web Title: How much to sow sorghum in Kharif season; Fear of a decrease in production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.