कोळसा आधारित ऊर्जा उत्पादन कमी करून कार्बनमुक्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
मात्र, सौर ऊर्जा, पवनऊर्जा, जैव ऊर्जा उत्पादनाची वाटचाल मंदगती आहे, तर ग्रीन हायड्रोजनचे प्रकल्पही सध्या प्रायोगिक तत्त्वावरच आहेत. यामुळे ही स्थिती पूरक नसून, ही वाटचाल अधिक गतिमान करण्याची गरज वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट इंडियाचे ऋषभ सोनी यांनी व्यक्त केली.
ऋषभ सोनी यांचा अहवालानुसार कोळसा आधारित ऊर्जा उत्पादन कमी करून कार्बनमुक्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
त्यामुळे ही स्थिती पूरक नसून, ही वाटचाल अधिक गतिमान करण्याची गरज वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट इंडियाचे ऋषभ सोनी यांनी व्यक्त केली. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ऋषभ सोनी यांनी सांगितले.
'अक्षय ऊर्जा, तसेच हवामान बदल, जागतिक तापमान वाढ' या बद्दल सविस्तर माहिती दिली. या समस्यांवर सांगोपांग चर्चा करण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ऋषभ सोनी यांनी देशातील व महाराष्ट्रातील अक्षय ऊर्जेच्या स्थितीवर प्रकाश टाकला.
आरोग्य सल्लागार डॉ. जया श्रीधर यांनी ''जीवाश्म इंधन व हवामान बदलाचे आरोग्यावर परिणाम'' या विषयावर मार्गदर्शन केले.
''नागपुरात सोलार रूफटॉप : राज्य आणि भविष्यातील शक्यता'' या विषयावर अतुल उपाध्याय, 'मोबाइल पत्रकारिता : परिचय' या विषयावर मनॉन वेरकॉट आणि सान्शेय बिस्वास यांनी भाष्य केले.
पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी हवामान बदलाच्या वृत्तांकनाचे पैलू समजावून सांगितले. संवादक, संशोधक, विषयतज्ज्ञ, धोरणकर्ते व नागरिक या सर्व घटकांमधील समन्वय साधण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. वृत्तांकनातून अहवालनिर्मिती कौशल्यात विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संत्र्यावरील फुलोरा जळून पडतो खाली
यावेळी ज्येष्ठ कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे विदर्भातील शेतीवर झालेल्या परिणामावर भाष्य केले. वृक्षतोड व काँक्रिटीकरणाने झालेल्या तापमान वाढीमुळे संत्र्यावरील फुलोरा जळून खाली पडतो.
२०२१ पर्यंत १४८६ क्युबिक मीटर असलेली भारताची पाण्याची उपलब्धता १३६७ क्यु.मी. पर्यंत खाली गेली आहे व २०३१ पर्यंत ती धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची व देशावर अन्नधान्य कमतरतेचे संकट ओढविण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.