Join us

आंबिया बहारातील फळपिकांसाठी विमा योजनेसाठी कसा लाभ घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:47 AM

अवेळी पाऊस,कमी तापमान, जास्त तापमान, गारपीट, जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा या हवामान धोक्यांपासून या योजनेंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. सर्वसाधारणपणे ज्या महसुल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे अश्या महसुल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसुचित करण्यात येवून तेथे ही योजना राबविण्यात येते.

विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची खुप गरज आहे. आंबिया बहार २०२२-२३ मधील संत्रा, मोसंबी, डाळींब, काजु, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्राबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी शासनाने हवामान आधारित पिक विमा योजना लागू केली आहे.

अवेळी पाऊस,कमी तापमान, जास्त तापमान, गारपीट, जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा या हवामान धोक्यांपासून या योजनेंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. सर्वसाधारणपणे ज्या महसुल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे अश्या महसुल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसुचित करण्यात येवून तेथे ही योजना राबविण्यात येते. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी फळ पिकांचे उत्पादनक्षम वय पुढीलप्रमाणे राहील.

अ.क्रफळपिकाचे नावउत्पादनक्षम वय
संत्रा
मोसंबी
डाळिंब
लिंबू
द्राक्ष
आंबा
काजू

या योजनेत आंबिया बहार मध्ये सन २०१६-१७ पासून ते सन २०२२-२३ पर्यंत एकूण भरलेला विमा हप्ता रु. ४४५९ कोटी असून आतापर्यंत मंजूर नुकसान भरपाई रू. ३९६४ कोटी आहे. विमा नुकसान भरपाईचे एकूण विमा हप्त्याशी प्रमाण ८९% आहे. यात शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता रक्कम रुपये ७८२ कोटी आहे. विमा नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्त्याशी प्रमाण ५०७ % आहे. आंबिया बहार मध्ये सन २०१६-१७ पासून ते सन २०२२-२३ पर्यंत काही ठळक पिकांची एकूण विमा हप्ता आणि नुकसान भरपाईची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

योजना पुढीलप्रमाणे कंपन्यांच्या माध्यमातून निवडक जिल्हात राबविण्यात येणार

- या योजनेत अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठी, आधार कार्ड, जमीन धारणा ७/१२ ८ (अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबूक, नोंदणीकृत भाडेकरार असणे आवश्यक आहे.- कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.- एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागु असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो. (मात्र त्या फळपिकासाठी ते महसुल मंडळ अधिसुचित असणे आवश्यक आहे)अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार पैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल. (उदा. द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब)- एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेवू शकतो.- शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा नियमित विमा संरक्षित रकमेच्या ५ % च्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. मात्र वास्तवदर्शी विमा हप्ता हा जर ३५% हून अधिक असल्यास शेतकऱ्याला नियमित ५% पेक्षा अधिक विमा हप्ता भरावा लागतो, म्हणून जिल्हानिहाय, पीक निहाय विमा हप्ता वेगवेगळा असू शकतो.

फळपिकनिहाय प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम रुपये आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे

टिप: विमा हप्ता वास्तववादी दर ५% पेक्षा कमी असल्यास, जो कमी दर आहे त्यानुसार शेतकऱ्यास विमा हप्ता भरावा लागेल.

फळपिकनिहाय विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी आणि विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे

या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. यात गारपीट व वेगाचे वारे यामुळे नुकसान झाल्यास ७२ तासाचे आत संबंधित विमा कंपनीस याबाबतची सूचना द्यावी लागेल. त्या नंतर वैयक्तिक पंचनामा करून नुकसान भरपाई अंतिम केली जाते. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

विनयकुमार आवटे कृषी सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) म.रा. पुणे -५

टॅग्स :पीक विमापीकफळेशेतकरीपंतप्रधान