Join us

आधारकार्डवरील फोटोला वैतागलात, बदलायचाय? इथं क्लिक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 5:34 PM

आधारकार्डवरील फोटो बरेचदा खराब आलेला असतो. पण तो बदलता येतो. शेतकरी बांधवांनो आधारकार्डवरील फोटो बदलणे आता सोपे आहे.

सरकारी योजनांचा लाभ मिळवायचा असो किंवा ओळखपत्र म्हणून उपयोग असो, आधारकार्डचा अनेक ठिकाणी वापर होतो.शेतीच्या बहुतेक योजनांसाठी आधार कार्ड आता आवश्यक झाले आहे. आधार कार्डवरील आधार क्रमांकासोबतच फोटोही महत्त्वाचा असतो. मात्र अनेक लोकांना आधार कार्ड काढायला बरेच दिवस झालेले असतात. 

त्यामुळे आताचा चेहरा आणि आधारकार्डवरील चेहरा यात फरक पडतो. याशिवाय अनेकांच्या आधारकार्डवरील फोटो त्यांना आवडतेच असे नाही.हा फोटो कसा बदलायचा? हे आपण जाणून घेणार आहोत.

तुमच्या आधार कार्डवरील फोटो बदलून त्याजागी तुम्हाला हवा तसा,चांगला दिसणारा,अलीकडे काढलेला फोटो ठेवता येतो.पण त्यासाठी ५० रुपये इतका खर्च येतो.ही फी भरून नवीन फोटो अपडेट केला की त्यानंतर दोन आठवड्याने हा फोटो आधारकार्डवर येईल.त्यानंतर ते डाऊनलोड करून हव्या त्या प्रकारात त्याची प्रिंट काढता येईल.

असा बदला आधारकार्डवरील फोटो१.आधार कार्ड फोटो जुना झाला असेल,अस्पष्ट झाला असेल किंवा तुमची ओळख पटवणे कठीण असेल, तर आधार कार्ड फोटो बदलू शकता.यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAIची वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागेल.

२.वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल.आता तुम्हाला येथे एक फॉर्म मिळेल, जो डाउनलोड करावा लागेल. यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल आणि तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जमा करावा लागेल. फॉर्मसोबत तुमची संबंधित कागदपत्रे जोडावी लागतील.

३ त्यानंतर,या फॉर्मसह आधार सेवा केंद्रावर जा, जिथे तुमचे आधी बायोमेट्रिक्स केले जातील.यानंतर तुमचा फोटो क्लिक होईल. आता येथून तुम्हाला एक पावती मिळेल.या पावतीवरून आधारवरचा फोटो कधी अपडेट होईल ते तुम्हाला समजेल. 

टॅग्स :आधार कार्डशेतकरीशेती