Lokmat Agro >शेतशिवार > कापसात मर रोग आलाय, कसे कराल नियंत्रण

कापसात मर रोग आलाय, कसे कराल नियंत्रण

How to control cotton blight disease | कापसात मर रोग आलाय, कसे कराल नियंत्रण

कापसात मर रोग आलाय, कसे कराल नियंत्रण

दिवसाचे तापमान ४० अंश सेंटीग्रेड च्या वर दीर्घकाळ राहील्यास कापूस पिकाची पांढरी मुळे अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाही, त्यामुळे पाने पिवळसर होतात, मलूल होतात पाने, खोड लालसर होतात.

दिवसाचे तापमान ४० अंश सेंटीग्रेड च्या वर दीर्घकाळ राहील्यास कापूस पिकाची पांढरी मुळे अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाही, त्यामुळे पाने पिवळसर होतात, मलूल होतात पाने, खोड लालसर होतात.

शेअर :

Join us
Join usNext

मर रोग ही कापूस पिकामध्ये अधिक तापमान दीर्घकाळ राहील्यास, पाण्याचा ताण पडल्यास आणि दीर्घ काळ कापूस पिकामध्ये पाणी साचूून राहील्यास आढळून येते. दरवर्षी असे बघायला मिळते. ही समस्या मुळांच्या कार्यरत राहाण्याशी निगडीत आहे. दिवसाचे तापमान ४० अंश सेंटीग्रेड च्या वर दीर्घकाळ राहील्यास कापूस पिकाची पांढरी मुळे अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाही, त्यामुळे पाने पिवळसर होतात, मलूल होतात पाने, खोड लालसर होतात. पाणी पिकात दीर्घकाळ साचून राहील्यावरही मुळांजवळ हवा नसल्याने पांढरी मुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण करू शकत नाहीत त्यामुळे कापसाचं झाड मलूल होऊन वरून सुकत येते. पाण्याचा ताण पडल्यास जमीनीतील वाढलेल्या तापमाना मुळे पांढरी मुळे अन्नद्रव्यांचे शोषण करू शकत नाही.

उपाययोजना

  • जमीनीत वाफसा अवस्था आणावी एवढाच वेळ ठिबक सिंचनाने सिंचन करावे.
  • अकस्मात मर ग्रस्त पिकाची मुळे उत्तमरित्या कार्यरत होण्याकरीता ह्युमिक अॅसिडचे ड्रेंचींग करावे. ठिबक मधून एकरी १.५ लिटर ह्युमीक अॅसिड सोडावे.
  • कापूस पिकावर विद्राव्य खत १९:१९:१९ - ४५ ग्रॅम + प्लेंटोझाईम / बायोझाईम ३० मिली + स्टिकर १० मिली ची फवारणी करावी.
  • कापूस पिकासाठी नियमीत फर्टीगेशन करावे. ठिबक सिंचनाद्वारे युरीया ३ किलो + १२:६१:० - २ किलो + पांढरा पोटॅश - १.० किलो प्रती एकर आठवड्यातून २ वेळा फर्टीगेशन करावे.
  • आकस्मीक मर ग्रस्त झाडांना कॉपर ऑक्सीक्लोराईड २ ग्रॅम (किंवा कार्बनडेझीम १ ग्रॅम) प्रती लिटर पाण्यात विरघळून १०० मिली मुळांजवळ ड्रेंचींग करावे.
  • मुळांजवळ खतांचे द्रावण टाकावे - १.५ किलो युरीया + १.५ किलो पोटॅश १०० लिटर पाण्यात विरघळून द्रावण तयार करून रोग ग्रस्त झाडांच्या मुळांजवळ १२५ मिली द्रावण टाकावे, ड्रेंचींग करावे.
  • फर्टीगेशन रेग्यूलर करावे.
  • सध्या सर्वत्र पाऊस चांगला होतांना वृत्त आहे. शेतात पाणी साचणार नाही ह्याची काळजी घ्या. पाण्याचा त्वरीत निचरा करावा.


डॉ. बी. डी. जडे
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ, जैन इरीगेशन सिस्टीम्स लि.
 

Web Title: How to control cotton blight disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.