Lokmat Agro >शेतशिवार > तुरीवरील किडींचा बंदोबस्त कसा कराल?

तुरीवरील किडींचा बंदोबस्त कसा कराल?

How to control pests in pigeon pea | तुरीवरील किडींचा बंदोबस्त कसा कराल?

तुरीवरील किडींचा बंदोबस्त कसा कराल?

तूर पिकातील प्रमुख किडींची व्यवस्थापन कसे करावे याबद्दल विस्तृत माहिती पाहणार आहोत.

तूर पिकातील प्रमुख किडींची व्यवस्थापन कसे करावे याबद्दल विस्तृत माहिती पाहणार आहोत.

शेअर :

Join us
Join usNext

डाळवर्गीय पिकांवर पेरणीपासून पीक निघेपर्यंत जवळजवळ २०० प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. साठवणुकीमध्येही अनेक किडी तुरीवर स्वत:चे पोषण करतात. परंतु फुले व शेंगावर होणाऱ्या किडीचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरले आहे. 
आपण तूर पिकातील प्रमुख किडींची व्यवस्थापन कसे करावे याबद्दल विस्तृत माहिती पाहणार आहोत.

१) मशागतीय पध्दती 
- घाटेअळीचे कोष नष्ट करण्यासाठी उन्हाळयात जमिनीची खोल नांगरट करावी. 
- शिफारस केलेल्या वाणाचीच योग्य अंतरावर पेरणी करावी. 
- ज्यावेळी तुरीची सलग पेरणी केली जाते त्यावेळेस बियाण्यात १ टक्का ज्वारी अथवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करावी. 
- तुरीबरोबर ज्वारी, बाजरी, मका अथवा सोयाबीन ही आंतरपिके घ्यावीत. 
- क्षेत्रिय (झोनल) पेरणी पध्दतीचा अवलंब करावा. संपूर्ण गावामध्ये एकाचवेळी पेरणी करावी. 
- वेळेवर आंतरमशागत करून पीक तण विरहित ठेवावे.

२) यांत्रिक पध्दती
पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत. 
शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यतणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. 
पुर्ण वाढ झालेल्या अळया वेचून त्यांचा नाश करावा. 
पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे शेतात लावावेत, जेणे करून त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळया वेचून खातील. 
शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत जेणे करून किडीची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल. 
तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या वेळोवेळी गोळा करून नष्ट कराव्यात.

३) रासायनिक पद्धती

कीडकीटकनाशक प्रमाण/१० लि. पाणी

शेंगा पोखरणाऱ्या किडी (शेंगा पोखरणारी अळी पिसारी पतंग, शेंगमाशी) ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी
क्विनलफॉस २५ ईसी किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी किंवा
स्पिनोसॅड ४५ एससी किंवा            
क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ टक्के किंवा
फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी किंवा
बेनफ्युराकार्ब ४० टक्के किंवा
इंडोक्झाकार्ब १४.५ एससी किंवा
इंडोक्झाकार्ब १५.८ एससी किंवा
ल्युफेन्युरॉन ५.४ टक्के किंवा


२८ मिली
४.५ ग्रॅम
३ मिली
३ मिली
२ मिली
५० मिली
८ मिली
७ मिली
१२ मिली

शेंगमाशीडायमेथोएट ३० टक्के१० मिली
शेंग ढेकुणडायमेथोएट ३० टक्के१० मिली



रासायनिक किटकनाशकांची फवारणी पट्टा पध्दतीने अथवा खंड पध्दतीने केल्यास परोपजीवी कीटकाच्या संवर्धनास मदत होते.

डॉ. ज्ञानदेव मुटकुळे
वरीष्ठ शास्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, बदनापुर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
 

Web Title: How to control pests in pigeon pea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.