Join us

कारळा तेलबिया पिकाची लागवड कशी करायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 10:43 AM

कारळा हे दुर्लक्षित केलेले; पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण व सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो.

कारळा बी स्वादिष्ट चटाण्या आणि खमंग मसाल्यामध्ये वापरण्यात येते. बहुपीक पद्धतीमध्ये मधमाशा आकर्षित करणारे व किडींना परावृत्त करणारे पीक आहे. असे हे बहुपयोगी कारळ्याचे पीक शेतकऱ्यांकडून पूर्णपणे दुर्लक्षिले आहे. या पिकाची लागवड मुख्यत्वे वरकस उताराच्या व साधारण प्रतीच्या जमिनीवर घेण्यात येते. विशेषतः खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून या पिकाचा आजवर विचार करण्यात आला आहे. पीक वाढीसाठी लागणाऱ्या अन्य घटकांचा किंवा सेंद्रिय खतांचा या पिकासाठी वापर केला जात नाही. हे पीक खूप दाट पेरल्यास खरीप हंगामात उंच वाढते, फांद्या कमी फुटतात. त्यामुळे पर्यायाने कारळ्याचे अपेक्षित पीक मिळत नाही.

कारळा हे दुर्लक्षित केलेले; पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण व सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. कारळ्याच्या पेंडीचा वापर जनावरांना खाद्य पेंड म्हणून करतात. विशेषतः दुभत्या जनावरांसाठी या पेंडीचा वापर केला जातो. कारण, या पेंडीमध्ये ३७ टक्के प्रथिने, २६ टक्के कार्बोदके व ४.५८ टक्के खनिजे असतात. या पेंडीचा वापर सेंद्रिय खत म्हणूनही केला जातो. या पेंडीमध्ये पाच टक्के नत्र, दोन टक्के स्फूरद, १.५ टक्के पालाश असते. कारळा हे पीक खरीप व रब्बी हंगामात घेता येते. कारळा पीक जादा पावसात तग धरते आणि पाण्याचा ताणही सहन करते.

प्रतिकूल परिस्थितीत या पिकाची चांगली वाढ होते. जमिनीतील सर्वसाधारण अन्नद्रव्याच्या पुरवठ्यातसुद्धा पीक उत्तम येते. या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे पाण्याचा ताण सहन करतात व जमिनीची धूप कमी होते. या पिकामध्ये अवकर्षण प्रतिकारकशक्ती असल्यामुळे कमीत कमी पाण्यात या पिकाची चांगली वाढ होते. या पिकास रोग, किडींचा विशेष प्रादुर्भाव होत नाही व उग्रवास असल्याने भटक्या जनावरांचाही त्रास कमी होतो. या पिकाला पिवळी फुले येतात व ती जास्त दिवस शेतात टिकून राहतात, त्यामुळे परपरागीकरणास उपयुक्त आहेत. आंतरपीक म्हणून चांगला प्रतिसाद लाभतो. कारळ्याचे तेल खाद्यतेल म्हणून उपयुक्त असून, पेंडीचा पशुखाद्य, पक्षीखाद्य सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो.

पिक उत्पादन त्याचबरोबर, सुशोभिकरणसाठी लागवडकारळ्याची पिवळी धम्मक फुले २० ते २५ दिवस टिकून राहण्याची क्षमता असल्याने या गुणधर्माचा योग्य वापर करून आपली शेतजमीन सुशोभित करण्यासाठी या पिकाची लागवड उत्तम ठरते. तृणधान्ये व भाजीपाला पिकांमध्ये अशा प्रकारे लागवड करणे शक्य आहे, अशा पिकांच्या भोवती लागवड करावी. शेताच्या सभोवताली बांधावर ३० बाय ३० सेंटिमीटर अंतरावर बांधाच्या आकारमानानुसार ओळीमध्ये कारळ्याची पेरणी करावी. त्यामुळे बांधावरील तणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मोकाट जनावरे व कीड रोगापासूनही पिकाचे संरक्षण होते.

टॅग्स :शेतकरीखरीपरब्बीशेतीकीड व रोग नियंत्रण