घर बसल्या पैसे मिळवून देण्याची सुविधा आणलीय पोस्ट खात्याने अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने. ही एक अशी सुविधा आहे , जिच्याद्वारे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुमची रोकड तुमच्या हातात मिळेल. त्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करावी लागेल.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे की तुम्ही तुमच्या घरातून सहज पैसे काढू शकाल. यासाठी पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक तुमच्या घरी मायक्रो एटीएम मशीन घेऊन येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक्स स्कॅन करावे लागतील.
किती रक्कम काढता येईल.
आधार एटीएम सेवेद्वारे पेमेंट केल्यावर, तुमच्या प्रत्येक व्यवहाराची कमाल मर्यादा दहा हजार रुपये असेल. याचा अर्थ असा की तुम्ही बँकेत न जाता तुमच्या घरातून एकावेळी दहा हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. ही रक्कम तुम्ही अनेकदा काढू शकता, त्यासाठी बंधन नाही. तसेच त्यासाठी पोस्टल बँक तुमच्याकडून घरी यायचे पैसे आकारणार नाही, मात्र तुमची बँक या सेवेचे पैसे आकारू शकते.
लाभ कोणाला मिळणार?
या आधार पेमेंट सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे बँकेमध्ये खाते असण्याची आवश्यकता आहे. तसेच तुमचा आधार क्रमांक बँक खात्याची जोडावा लागेल. तरच हा लाभ बँकेकडून मिळेल. मात्र पैसे काढताना तुम्हाला आधार क्रमांक किंवा आधार कार्ड दाखविण्याची गरज नाही.
पोस्टमन बायोमेट्रिक मशीन घेऊन तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्हाला ते स्कॅन करावे लागेल. बायोमेट्रिक स्कॅन पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील.
या सुविधा मिळतील घरबसल्या
तुम्ही तुमच्या खात्यातून रोख पैसे काढू शकता (रोख पैसे काढणे). खात्यातील शिल्लक तपासता येईल.बँकेचे मिनी स्टेटमेंट मिळते. विशेष म्हणजे तुम्ही आधार ते आधार पैसे ट्रान्सफर करू शकता. याचा अर्थ तुम्ही फक्त तुमची आधार माहिती देऊन तुमच्या आधारद्वारे पैसे दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता.
फसवणुक होणार नाही
सध्या बँक व्यवहारांबाबत अनेक प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत IPPB ने तुम्हाला तुमच्या पेमेंटशी संबंधित माहिती देण्यासाठी नियम बनवले आहेत, जेणेकरून कोणीही तुम्हाला चुकीची माहिती देऊ नये. या सेवेअंतर्गत, तुमच्या व्यवहाराची स्थिती केवळ पोस्टमनलाच दिसेल जो तुम्हाला m-ATM (मायक्रो एटीएम) आणेल. याव्यतिरिक्त, जर तुम्ही मोबाईल अलर्टसाठी नोंदणी केली असेल, तर तुम्हाला व्यवहारानंतर लगेच एक संदेश प्राप्त होईल.
घरबसल्या बँकेतून पैसे काढण्याची पद्धत अशी आहे
१. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक IPPB च्या अधिकृत वेबसाइटवर डोअर स्टेप बँकिंगसाठी विनंती फॉर्म मिळेल.
२. त्यात तुम्हाला नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता असेल. तसेच पिन कोड, जवळचे पोस्ट ऑफिस, तुमचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेचे नाव म्हणजे लिंक केलेली शाखा, विभाग, क्षेत्र, मंडळ आणि राज्य याबद्दल माहिती द्यावी लागेल.
३. मग काय, तुम्हाला Agri वर क्लिक करावे लागेल.
४. त्यानंतर पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक तुमच्या दारात मायक्रो एटीएम घेऊन हजर होतील.