हिवाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून वाचण्यासाठी तसेच शरीराला ऊर्जा देणाऱ्या मधाचं सेवन वाढतं. अनेकदा कोणता मध शुद्ध आहे हे मात्र कळणं कठीण जातं. बाजारात अनेकवेळा सुटा मध घेताना भेसळयुक्त मधाची विक्री करून फसवले जाते. पण शुद्ध मध आणि भेसळयुक्त मधातला फरक कसा तपासायचा? जाणून घेऊया..
मध तापसण्याच्या सोप्या पद्धती..
अनेकदा मधाची चव, रंग, वास यावरून अनेकजण मध शुद्ध आहे की नाही ठरवतात. पण त्यातही भेसळ होऊ लागल्याने तशाच रंगाचा भेसळयुक्त मध विकला जाऊ लागला आहे. भेसळयुक्त मध खाल्याने पोटाच्या किंवा अपचनाच्या समस्या वाढू शकतात. परिणामी मधाची शुद्धता न तपासता तसाच मध खाणं आजारांना आमंत्रण देणारं ठरू शकतं. त्यापेक्षा या सोप्या पद्धतींनी तुम्हाला तपासता येईल मधाची शुद्धता..
पाण्यात मध विरघळला तर..
पाण्याने शुद्ध मधाची शुद्धता तपासण्याची पद्धत अनेकांना माहित असेल. एक ग्लास पाण्यात मधाची बारीक धार सोडा. जर मध पाण्यात विरघळत असेल तर तो मध भेसळयुक्त आहे असे समजावे. जर मध ग्लासच्या तळाशी जमा होत असेल तर मध शुद्ध आहे असे समजावे.
हेही वाचा-बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना चाखता येणार मधाचा गोडवा!
हवामान बदलाचा होतो मधावर परिणाम
हिवाळ्यात मध अधिक घट्ट होतो. तर उन्हाळ्यात तो वितळतो. मधामध्ये वातावरणानुसार बदल घडत असतो. जर हा बदल दिसत नसेल तर तो मध भेसळयुक्त समजावा.
पांढऱ्या कपड्यावरील डाग
एखाद्या पांढऱ्या कपड्याला थोडासा मध लावून तो थोड्या वेळाने धुवून काढा. शुद्ध मधाचा डाग कपड्यावर पडत नाही. तो जर पडत असेल तर मध तो मध भेसळयुक्त आहे असे समजावे.