Lokmat Agro >शेतशिवार > सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग कसा ओळखावा? व त्याचे नियंत्रण

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग कसा ओळखावा? व त्याचे नियंत्रण

How to identify yellow mosaic disease on soybean? and its control | सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग कसा ओळखावा? व त्याचे नियंत्रण

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग कसा ओळखावा? व त्याचे नियंत्रण

महाराष्ट्रात विषेशतः मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून त्याचबरोबर त्यावर उपजिवीका करणारे किड व रोग वाढत आहेत. शंखी गोगलगाय व पिवळा ...

महाराष्ट्रात विषेशतः मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून त्याचबरोबर त्यावर उपजिवीका करणारे किड व रोग वाढत आहेत. शंखी गोगलगाय व पिवळा ...

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रात विषेशतः मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून त्याचबरोबर त्यावर उपजिवीका करणारे किड व रोग वाढत आहेत. शंखी गोगलगाय व पिवळा मोझॅक रोग हे सोयाबीनवरील दुय्यम किड व रोग देखील प्रमुख किड व रोग ठरत आहेत. प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे
-
झाडाची वाढ खुंटते. पाने आखूड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजून दुमडतात.
सुरूवातीला पानवर पिवळ्या रंगाचे छोटे चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या चट्यांचा आकरमान वाढत जातो अणि संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरीतद्रव्याच्या ऱ्हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस करपट रंगाचे ठिपके दिसतात.
झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. फुलोरा उशिरा येतो व शेंगा कमी लागतात तसेच दाने लहान भरतात किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत व पोचट उपजतात.

प्रसार
प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाणांव्दारे होतो. साधारणपणे ३० अंश से. पेक्षा जास्त तापमान या रोगास पोषक असून या हवामानात रोगाची लक्षणे ठळकपणे दिसून येतात.
हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषणुंमुळे उद्भवतो. दुय्यम प्रसार पांढऱ्या माशीव्दारे होतो.
सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किंडीद्वारे या रोगाचा प्रसार होता.
या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर तो जवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.
या रोगास बळी पडणाऱ्या वाण/जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रदुर्भाव वाढतो.

नियंत्रण
प्रतिबंधात्मक उपाय
पेरणीसाठी निरोगी बियाणांचा वापर करावा, तसेच रोग प्रतीकारक वाण किंवा जातीची निवड करावी.
सोयाबीनची उन्हाळी लागवड व मे महिन्यात होणारी लागवड टाळावी.
सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूर ही अंतरपिके घ्यावीत.
शेत तणमुक्त ठेवावे.
शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकड उपसून नष्ट करावीत.

जैविक नियंत्रण
पिक पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रण
थायोमिथाक्झाम ३० टक्के एफ.एस. या किटकनाशकाची १० मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रीया करावी.
ट्रायझोफॉस ४५ ई.सी. १६ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी.
असिटामिमॅप्रीड २५ टक्के बायफेनथ्रीन २५ टक्के डब्लू. जी. या किटकनाशकाची ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पांढऱ्या माशीचा उद्रेक पुन्हा टाळण्यासाठी सिंथेटीक पायरोथ्राईड या किटकनाशकाची करू नये.
प्रादुर्भाव रोकण्यासाठी पांढरी माशी आणि मावा किडीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी इमिडाक्लोप्रिड १७ टक्के एसएल २.५ मिली किंवा फलोनिकामाईड ५० टक्के डब्ल्यु जी-३ ग्रॅम किंवा थामोमिथोक्झाम २५ टक्के जी डब्ल्यू ३ ग्रॅमप्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिवळे चिकट सापळे सोयाबीन पिकात हेक्टरी १० ते १२ या प्रमाणे लावावेत.

प्रा. अपेक्षा कसबे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या)
श्री. मोरेश्वर राठोड, वरीष्ठ संशोधन सहायक
श्री. शाम शिंदे, तंत्र सहायक

कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर

Web Title: How to identify yellow mosaic disease on soybean? and its control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.