Join us

रेशीम शेतीत उझी माशीचे व्यवस्थापन कसे करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:20 PM

आजही उझीमुळे २० ते २५ टक्के नुकसान होते. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो.

रेशीम किटकांना उपद्रव करणा या किडीमध्ये उझी माशी (Uzi Fly) ही परोपजीवी असणारी रेशीम शरीरावर अंडी घालते आणि रेशीम पारंपारिक राज्यामध्ये आजही उझीमुळे २० ते २५ टक्के नुकसान होते. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. उझी माशीचा प्रादुर्भाव एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीद्वारे वेळीच रोखला नाही तर रेशीम उत्पादनात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान नजीकच्या काळात सोसावे लागेल.

उझी माशी काय आहे? इतर सर्वच ठिकाणी वावरणाऱ्या आणि इतरत्र घाणीवर पैदास होणाऱ्या आपल्या सर्वाच्या परिचयाच्या आहेत. याच कुळात (Diptera) मोडणारी उझी माशी उपशास्त्रीय भाषेत या माशीला ट्रायकोलायगा बॉम्बीसिस (Tricholyga bombycis) असे म्हणतात.

उझी माशीचा जीवनक्रमउझी माशीचा आकार घरगुती माशीच्या तुलनेत बराच मोठा असतो. ही माशी काळसर करड्या रंगाची असते. शरीरावर गडद पट्टे दिसतात. रेशीम किटकांच्या चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेतील शरीरावर प्रामुख्याने उझी मादी अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा असून ती चमकदार दिसतात. एक उझी मादी २५० ते ३०० अंडी घालते. एका रेशीम दोन चार अंडी अळीच्या खंडवलय यांच्या जोड रेषांवरच प्रामुख्याने घातली जातात. उझी माशीने घातलेल्या अंड्यातून १ ते ३ दिवसात माशीची अळी जन्मते.

नुकसान कशा करतात?उझी माशीच्या अळ्या त्वचेला छिद्र पाडून शरीरात प्रवेश करतात व त्या ठिकाणी रेशीम अळीच्या शरीरावर काळसर डाग दिसतो. या काळसर छिद्रावाटे उझी माशीच्या परोपजीवीला श्वसनाचा पुरवठा होतो. या माशीची अळी रेशीम अळीच्या शरीरातील मेद/चरबी आणि इतर भागांचा फडशा उडविते. पूर्ण वाढीच्या अळीला अन्नाची गरज उरत नाही आणि मग ती अळी रेशीम अळीच्या शरीरातून बाहेर पडते. व नंतर रेशीम मरते. मात्र रेशीम किटकाच्या पाचव्या अवस्थेतील उझी माशीने अंडी घातली तर रेशीम अळी कोष बांधणीचे काम पूर्ण करू शकते, आणि कोषातून पूर्ण वाढ झाल्यानंतर बाहेर पडते. उझी माशीची अळी रेशीम अळीच्या पोटात ७ दिवस राहते. बाहेर पडल्याबरोबर २४ तासात उझी माशीचे रूपांतर कोषावस्थेतील (प्युपा) किटकात होते. साधारणपणे उझी माशीची अळी जमिनीवर पडते, व भुसभूशीत मातीत घुसते नाहीतर चंद्रिकेवर संगोपन कप्यात, सध्या शेतकरी शुट फीडींगचा वापर करतात. त्यामुळे कप्यातील फांद्या व विष्टामध्ये किंवा जमिनीवरील फटीमध्ये पडून कोषावस्थेत जाते. माशीचा जन्म हा हंगामानुसार कमी जास्त असतो. तथापि, साधारण १०-१५ दिवसात पूर्ण होतो. अंडी अवस्थेपासून माशी साधारणतः १७ ते २४ दिवसात तयार होते.

उझी माशीची ओळख आणि उझी माशीचे नियंत्रणाचे उपाय१) नॉयलॉन जाळी वापरकर्नाटक व इतर पारंपारिक रेशीम उत्पादक राज्यातील शेतकरी रेशीम उद्योग सुरू करतांनाच उझी माशीचा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टिने नियोजन करतात. किटक संगोपनगृह बांधताना प्रवेश करण्यापूर्वी उझी माशीला रोखले जाते. ज्याप्रमाणे डास किंवा माशांचा उपद्रव कमी करण्यासाठी त्याचा घरातील प्रवेश रोखावा लागतो, त्यासाठी दारे, खिडक्यांना जाळी बसवितात. त्याचप्रमाणे उझी माशीचा प्रवेश होवू नये म्हणूनही जाळी वापरतात. किटक किंवा किटक संगोपन रॅक/ट्रे भोवती नॉयलॉनची जाळी टाकतात. यासाठी खर्च करावा लागतो. १०० अंडीपूजाच्या संगोपनासाठी साधारण २५० चौ. फूट जाळी लागते. जाळीसाधारण २ वर्ष टिकते.

२) उझी प्रतिबंधक औषध (उझीसाईड)म्हैसूर येथील केंद्रिय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्थेने उझी माशीचा नाश करण्यासाठी एक औषध तयार केले आहे. त्याला उझीसाईड असे म्हणतात. हे औषध उशी माशीने रेशीम अळीच्या शरीरावर घातल्या गेलेल्या अंड्यांचा नाश करते मात्र रेशीम या शरीरात घुसलेल्या अळयांवर त्याचा परिणाम होत नाही. उझीसाईड बेंगलोर येथील अनेक कंपनीद्वारे उत्पादन केले जाते. साधारणतः १०० चौ. फुट क्षेत्रासाठी १ ते २ लिटर द्रावण फवारणीसाठी उपयोगी पडते. ६ मिली चौ. फुट प्रमाणे औषधाची फवारणी रेशीम किटकाच्या तिसऱ्या अवस्थेपासून चौथ्या अवस्थेपर्यंतच्या काळात एक दिवसा आड करावी. पाचव्या अवस्थेत ती दुसऱ्या व चौथ्या दिवशी करावी. एका फवारणीनंतरच्या ४ तासाच्या आत रेशीम अळ्या जर तिसऱ्या किंवा चौथ्या कातीवर जाणार असतील, तर त्यापूर्वी पुन्हा एकदा औषधाची फवारणी करावी. पाचव्या अवस्थेतील रेशीम अळयांना कोशावर यायला ६ दिवसाहून अधिक काळ लागणार असेल तर सहाव्या दिवशी शेवटची फवारणी करावी. प्युअर म्हेमूरच बायव्होल्टाईन/सी. एस. आर. जातीच्या बीज कोष निर्मितीच्या अळयांवर कोष बांधणीवर एकदा फवारणी करणे चांगले.उझीसाईड औषधाची फवारणीची पद्धतरेशीम अळ्यांना खाद्य दिल्यानंतर दोन तासानी औषधाची फवारणी करावी. म्हणजे खाद्यपाने संपून अळ्या उघड्या पडलेल्या असतात व फवारणी परिणामकारक होते. फवारणीनंतर किमान अर्ध्या तासापर्यंत पुन्हा खाद्य देवू नये. फवारणीसाठी वापरावयाचे औषध अगदी फवारणी करण्यापूर्वी थोडा वेळच आधी पंपात भरावे बाजारात प्लॅस्टिकचे हलके, लहान फवारणी पंप मिळतात. औषधाची बाटली फक्त उपयोगाआधीच उघडावी. औषध वापरण्यापूर्वी त्यावर पांढरे कण किंवा साका (गाळ) दिसल्यास ते वापरू नये व औषधाची बाटली नेहमी हवाबंदच ठेवावी. सुर्यप्रकाश व लहान मुलांच्या हाती पडणार नाही अशा सुरक्षित जागी ठेवावी. कोष बांधणीच्यावेळी चंद्रिकेतील अळ्यावर दळून बारीक केलेली गुळगुळीत चिनी मातीची भुकटी कपड्यातून धुरळावी. अशामुळे कोष बांधणीच्या कामात उझी माशीचा रेशीम अळीवर संभाव्य हल्ला टळतो. १०० अंडीपूजासाठी कोष अवस्था काळात ३ किलोग्रॅम भुकटी धुरळावी.

३) उझीट्रॅपहे औषध केंद्रिय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हैसूर येथे विकसित करण्यात आलेले आहे.उझी माशांना आकर्षित करून मारण्यासाठी वापरण्याची पद्धत आणि प्रमाण- गोळ्याच्या द्रावण पांढऱ्या पात्रात ठेवावे/आकारमान ११ इंच लांब, २ इंच काठाची उंची त्यामध्ये २ से.मी. द्रावण पातळी ठेवावी.- एक उझीट्रॅप गोळी १ लिटर पाण्यात टाकून द्रावण तयार करावे. पिवळे द्रावण तयार होते. द्रावणयुक्त भांडे खिडकीत किंवा त्यांचे उंचीपर्यंत किटक संगोपन गृहाच्या भोवती पांढऱ्या पात्रात ठेवावे.- जर उझी माशांनी संगोपन गृहात अगोदरच प्रवेश केला असेल तर द्रावण संगोपन गृहामध्ये सुद्धा ठेवावे.किटक संगोपन गृहात सर्व ठिकाणी प्रकाश न देता काही ठिकाणी अंधार आणि काही ठिकाणी प्रकाश ठेवावा.उझी माशी अंधाराकडून प्रकाशाकडे आकर्षित होतात व त्याच ठिकाणी उझी टॅप गोळ्याचे द्रावण असल्यास अधिक आकर्षित होवून द्रावणात पडतात.- एकदा तयार केलेले द्रावण दोन ते तीन दिवस वापरता येते.- तयार केलेले द्रावण धुळ, किटकांमुळे घाण झाल्यास बदलवून टाकावे.उझी ट्रॅपचा उपयोग रेशीम किटकांच्या तिसऱ्या अवस्थेपासून कोष गुंडाळण्याच्या अवस्थेपर्यंत वापरावा. याचे वापरामुळे उझी उपद्रव मोठ्या प्रमाणात कमी होतो. व होणारे नुकसान टाळता येते. मानव पाळीव प्राणी व पाळीव जनावरासाठी हे औषध सुरक्षित आहे. रेशीम किटकासाठी अत्यंत सुरक्षित असून कमी खर्चीक आहे.

४) जैविक कीड नियंत्रणजैविक कीड नियंत्रणात ज्या जैविक कीड्यांचा वापर केला जातो त्यामध्ये खालीलप्रमाणे गुणधर्म असावे लागतात.शत्रु कीड/खाद्य शोधण्याची मोठी क्षमता.शत्रु कीडीवर परोपजीवी म्हणून राहण्याची क्षमता.शत्रु कीडपेक्षा कमी जीवनचक्र असावे.प्रयोगशाळेत जैविक कीड सहजा सहजी निर्माण करता आली पाहिजे.अधिक तापमान सहन करण्याची क्षमता असली पाहिजे.ठराविक शत्रु कीडीवर परोपजीवी म्हणून राहण्याची मोठी क्षमता असली पाहिजे.प्रत्यक्ष क्षेत्रात बदलत्या वातावरणाशी समरस होण्याची, जिवंत राहण्याची क्षमता असावी.उझी माशीचे नियंत्रणासाठी अनेक जैविक कीडी (मित्र कीडी) उपलब्ध आहेत.मित्र किड म्हणून जैविक कीड (नेसोलॅन्क्स थायमस) अत्यंत प्रभावी आहे.

जैविक कीड कशी काम करते?जैविक कीड प्रत्यक्ष उझी माशी उपद्रव ठिकाणी सोडल्यानंतर ६ तासामध्ये ७५ टक्क्यापेक्षा जास्त उझी प्युपा खत्म करतात.एक दिवसाचे उझी प्युपा असतील तर पाच प्युपासाठी एक (नेसोलॅन्क्स यायमस) अंडी घालून त्याचा नायनाट करते.उझी माशीचे प्युप्यावर नेसोलॅन्क्स थायमस ही जैविक कीड परोपजीवी म्हणून राहते. उझी माशीचे एका प्युप्यावर एक माशी १०० ते ११० अंडी घालते व प्युप्यामध्ये आपले जीवनक्रम पूर्ण करून पूर्ण विकसित झालेल्या जैविक कीडीच्या माशा उझी प्युप्यामधून बाहेर पडतात.उझी प्युपा अशा प्रकारे नष्ट झाल्याने प्रौढ उझी माशाच तयार होत नाहीत. जैविक कीड २४ तास निसर्गात उझी माशीचे प्युपा शोधते व उझीचे जैविक नियंत्रणास मदत करते. सध्या म्हैसूर येथील रेशीम संस्थेत नाममात्र किंमतीत जैविक किड कीटक मिळतात किंवा शेतक-यांच्या पत्त्यावर पार्सलव्दारे पाठवले जापू शकतात.

५) उझी नाश: हे औषध सेरिकेयर कंपनी बेंगलोर यांनी केंद्रिय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हैसूर यांचे तंत्रज्ञाने तयार केलेले आहे. व्यवसायिकदृष्टया उत्पादन व विक्री सेरीकेअर बेंगलोर या कंपनीव्दारे केली जाते. १ किलोग्रॅम पावडर पॅक मध्ये उपलब्ध आहे.घ्यावयाची काळजी- उझी नाशचा वापर करतांना बेडमध्ये पाला नाही याची खात्री करावी.जनावरांना औषध मारलेला/शिल्लक पाला खायला देवू नये.तोंडाला रुमाल बांधून औषध फवारावे.औषध फवारणीनंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्यावे.फायदे- उझी माशीची अंडी व नुकतेच जन्मलेल्या अळ्या मरतात.उझी प्रादुर्भाव कमी होतो.उझी पासून नुकसान कमी झाल्याने कोष उत्पादन वाढते.- शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादनात वाढ होते.

घरमाशींवर प्रतिबंधक उपायउझी माशी जशी रेशीम उद्योगात अपायकारक आहे तशीच घरमाशी ही मानवी आरोग्यास अपायकारक आहे. घरमाश्या विविध प्रकारचे जंतू, जिवाणू घाणीवरून अन्न पदार्थावर पसरवतात. त्यामुळे मानवी आरोग्यास नुकसान पोहोचते. घरमाश्यांचा प्रार्दुभाव पोल्ट्री, गोठा, सार्वजनिक शौचालये, हॉटेल्स् इ. ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येतो. या घरमाश्यांचे नियंत्रणसुद्धा जैविक पद्धतीने करता येते. मित्र कीडी (नेसोलॅन्क्स थायमस) जशी उझी माशीवर प्रभावी ठरते तशीच ती घरमाशीवरसुद्धा प्रभावी ठरते. विना कोणत्याही रासायनिक कीटकनाशक वापरता घरमाश्यांवर नियंत्रण मिळवता येते. मित्र कीडीचे पाऊच जर गोठ्यात, पोल्ट्रीत लावले तर नविन तयार होणाऱ्या घरमाश्यांना नष्ट करून त्यांचा प्रार्दुभाव रोखता येतो.डॉ. ए. डी. जाधवरेशीम विषयातील वरिष्ठ तज्ञ आहेत

टॅग्स :रेशीमशेतीशेतकरीकीड व रोग नियंत्रण