Lokmat Agro >शेतशिवार > सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन कसे कराल?

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन कसे कराल?

How to manage yellow mosaic disease in soybean? | सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन कसे कराल?

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन कसे कराल?

या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी द्वारे केला जातो.

या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी द्वारे केला जातो.

शेअर :

Join us
Join usNext

हा रोग विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि विविध तणे ही याची पर्यायी यजमान वनस्पती आहेत. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी द्वारे केला जातो. या रोगाच्‍या व्‍यवस्‍थापनाबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

रोगाची लक्षणे: 

  • सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात.
  • त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात.
  • लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यामधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते.
  • हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी द्वारे केला जातो.
     

सोयाबीनवरील पांढरी माशी आणि पिवळा मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन:

  • सोयाबीन पिकांचे वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.
  • पिवळा मोझॅक झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत, जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.
  • रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायमिथोक्झाम २५ टक्के हे कीटकनाशक ४० ग्रॅम प्रति एकरी फवारावे.
  • फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.
  • पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.
  • मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे.
  • कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे. पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
  • बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
     

अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी ०२४५२ २२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. 

Web Title: How to manage yellow mosaic disease in soybean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.