Lokmat Agro >शेतशिवार > प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल?

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल?

How to participate in Pradhan Mantri Crop Insurance Yojana for Rabi Season 2023-24? | प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल?

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल?

रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

शेअर :

Join us
Join usNext

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.

रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता ३० नोव्हेंबर, २०२३, गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा करिता १५ डिसेंबर, २०२३ व उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग पिकाकरिता ३१ मार्च, २०२४ अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय (PMFBY) ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा ( 6 पिके ) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. सन २०२३-२४ पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिश्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये ४० देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ 1 रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.

योजनेतील सहभागासंदर्भात शेतकऱ्यांना अडचण तसेच सामूहिक सेवा केंद्राने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, नजिकची बँक, तहसीलदार/तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

योजना कार्यान्वयीन यंत्रणा आणि समविष्ट जिल्हे

विमा कंपनीसमविष्ट जिल्हे
ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि.अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कं.लि.परभणी, वर्धा, नागपूर
युनिव्हर्सल सोम्पो जनरल इं. कं. लि.जालना, गोंदिया, कोल्हापूर
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
चोलामंडलम एम. एस. जनरल इं. कं. लि.छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड
भारतीय कृषी विमा कंपनीवाशिम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार, बीड
वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार, बीडहिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशीव
रिलायन्स जनरल इन्शुरन्सयवतमाळ, अमरावती, गडचिरोली
लातूरलातूर

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन पिकाचा विमा काढण्याचे आवाहन कृषी संचालक श्री. झेंडे यांनी केले आहे.

Web Title: How to participate in Pradhan Mantri Crop Insurance Yojana for Rabi Season 2023-24?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.