Lokmat Agro >शेतशिवार > आता गटारीवरचे नव्हे, तर घरच्या अळूची खा भाजी? अगदी सोपी आहे लागवड

आता गटारीवरचे नव्हे, तर घरच्या अळूची खा भाजी? अगदी सोपी आहे लागवड

How to plant colocasia leaves in terrace garden? | आता गटारीवरचे नव्हे, तर घरच्या अळूची खा भाजी? अगदी सोपी आहे लागवड

आता गटारीवरचे नव्हे, तर घरच्या अळूची खा भाजी? अगदी सोपी आहे लागवड

परसबागेत आपण लागवड करत असलेल्या भाज्या या नेहमीच्याच असतात तर कधी अनोळखी असतात. अनोळखी या अर्थाने की त्या खरं तर रानभाज्या असतात. पण केवळ माहिती नसल्यामुळे आपण त्या तण, गवत म्हणून फेकून देतो. खरं तर त्या अगदी पोषक असतात, त्या शरीराला उपयुक्त असतात.  त्यापैकीच एक आहे अळू.

परसबागेत आपण लागवड करत असलेल्या भाज्या या नेहमीच्याच असतात तर कधी अनोळखी असतात. अनोळखी या अर्थाने की त्या खरं तर रानभाज्या असतात. पण केवळ माहिती नसल्यामुळे आपण त्या तण, गवत म्हणून फेकून देतो. खरं तर त्या अगदी पोषक असतात, त्या शरीराला उपयुक्त असतात.  त्यापैकीच एक आहे अळू.

शेअर :

Join us
Join usNext

अशी करा लागवड 
अळूची पाने ही घरच्या बागेत, परसबागेत सहजपणे उगवतात.  शहरीकरण नव्हते तेव्हा मोरीच्या पाण्यावर त्या सहजपणे पोसल्या जात असत. अर्थातच तेव्हांची मोरी सुध्दा आजच्या सारखी रसायनांनी दुषित झालेली नव्हती. अळूची पाने टेरेसवर विविध साधनात, नर्सरी बॅगेत, शुद्ध पाण्यावर सुध्दा पोसल्या जातात. ग. बा. पध्दतीने बॅग भरली तरी त्यात अळूचे कंद पोसली जातातच पण पानांचा आकारही वाढतो.

(ग. बा. पध्दत म्हणजे कुंडीत नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, व माती असे थर द्यावेत) या भाजीला बाजारात मागणी असल्यामुळे महानगरांमध्ये रेल्वेच्या, गटारीच्या दुषित पाण्यात वाढवल्या जातात. किंवा शेतात विषारी खते टाकून भरभर वाढवली जातात. त्यामुळे ही भाजी घरीच उगवलेली उत्तम. त्यासाठी १८ बाय १२ इंचाची व १२ इंच खोलगट अशी कुंडी वापरणे योग्य, किंवा माठ, बादली, टब मधेही वाढवता येतात.

पानांची वाढ होत नसल्यास
घरच्या कुंडीत वडीचे व भाजीचे अळूच्या पानांची लागवड करता येते. गच्चीवर स्वच्छ पाण्यात यांची वाढ करता येते. कुंडी ही पालापाचोळ्याने भरलेली असल्यास त्यात अळू छान वाढतात. कुंडीत माती घट्ट झाली असता पानांचा आकार लहान होत जातो. अशा वेळेस कुंडीची नव्याने भरून घ्यावी. अथवा अळूचे कंद हे प्लास्टिक बॅगेत ठेवून त्यास सात ते पंधरा दिवस वाफ द्यावी म्हणजे त्याची लागवड केल्यास पानांचा आकार वाढतो.

दोन प्रकारचे अळू
अळूची भाजी… अळूची भाजी यात दोन प्रकार असतात. एक वडीचे अळू व दुसरी भाजीचे अळू.
वडीचे अळू.. वडीचे अळू हे लांबट , गर्द हिरवा, निळसर दिसतात. थोडक्यात कृष्ण रंगाचे असतात. वडीचे अळू खाजरे म्हणजे घशाला खवखवणारे नसतात. वडीचे अळूस जमीन, पाणी योग्य प्रमाणात मिळाल्यास या पानांची लांबी ही तीन ते चार फूट तयार होते. घाबरून जावू नये. या एकाच पानात घराला पुरेल एवढी एका वेळेची भाजी किंवा वड्या तयार होतात.

वड्या कशी तयार कराव्यात?
बेसन पिठात जिरे, मिठ टाकून भजीसारखे पिठ तयार करावे. ते पानांवर बोटांनी लावून त्यावर पाने पिठाने चिटकवत जावे. पानांमधे थोडे थोडे तीळ टाकावेत. थोडक्यात पुड तयार करावेत. यांचा रोल तयार होईल असे पाहावे. त्यास धागा बांधता आल्यास उत्तम. या पध्दतीने रोल कुकरच्या डब्ब्यात ठेवून वाफवून घ्यावे. वाफवलेले रोल गार झाल्यानंतर सुरीने कापून घ्यावेत. अशा गोलाकार वड्या तळून किंवा तव्यावर परतून आपण त्या आठवडाभर फ्रिज मधे ठेवू शकता. अळूच्या पानात तंतुयुक्तता ( फायबर) जास्त असल्यामुळे ते पचनास हलके असतात. अळूच्या पानांच्या सेवनाने मुतखडा बरा होतो.

भाजीचे अळू… 
ही पाने गोलाकार व हिरवट रंगाची असतात. यांची शक्यतो वडी बनवू नये. माल मसाला कमी पडल्यास घशाला खाज येण्याची शक्यता असते. भाजीच्या अळूंची भाजीच करावी. कारण भाजीत वापरलेली चिंच व शिजवल्यामुळे त्यातील खाजरेपणा निघून जातो.

सावधानः अळू सदृश्य ही काही रंगीत अळूची पाने किंवा शोभेच्या वनस्पती असतात. यांची खात्री करूनच भाजी करावी.

-संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक
संपर्क :9850569644 / 8087475242
(लेखक शहरी बगिचा आणि विषमुक्त अन्न निर्मिती या विषयातील तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: How to plant colocasia leaves in terrace garden?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.