Join us

थंडीपासून रेशीम शेतीचे संरक्षण कसे करावे? तापमान नियंत्रणासाठी हे करा..

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 26, 2024 3:30 PM

या पद्धतीने वाचेल मजूरी, तापमानासाठी तूती रेशीम शेतीला वाचवण्याची गरज...

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून वेगवेगळ्या पिकांसाठी लागणारे तापमान बदलल्याने नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.थंडीमध्ये रेशीम शेतीची काळजी घेण्याची गरज कृषी हवामान केंद्राने दिली आहे. रेशीम किटकांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जिल्हा कृषीसल्ला दिला आहे.

तापमान नियंत्रणासाठी वापरा कोळशाची शेगडी

  • रेशीम किटकांचे थंडी पासून संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहात कोळशाची शेगडी किंवा ईलेक्ट्रानिक शेगडीचा वापर करावा. 
  • संगोपनगृहात कोळश्याचा धुर होणार नाही याची काळजी घ्यावी व तापमान 22 ते 28 अं.से. व आर्द्रता 80 ते 85 टक्के राहील याची काळजी घ्यावी.  

हे केल्यास मजूरीत होईल बचत

फांदी पध्दती मध्ये 20 टक्के मजुरीत बचत होते. कच्या संगोपन गृहात थंडी किंवा उष्णता मर्यादीत ठेवणे कठीण होते. म्हणून हळूहळू पक्के सिमेंट काँक्रेटचं संगोपनगृह बांधकाम करून घ्यावे. त्यामूळे रेशीम कीटक रोगास बळी पडत नाहीत. धुळीचा त्रास कमी होतो आणि कोषाच्या उत्पादनात वाढ होते. 

सीएसआर & टीआय म्हैसूर यांच्या शिफारसीनूसार संगोपनगृहाचा आकार असावा. खालच्या व वरील बाजूस झरोखे व मधील बाजूस खिडक्या असाव्यात म्हणजे हवा खेळती राहण्यास मदत होते.

मराठवाड्यात कसे राहणार तापमान?

राज्यभरात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान पुढील पाच दिवस मराठवाड्यात कमाल तापमानात १ ते २ अंशांची वाढ होणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले आहे.दिनांक 28 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2024 दरम्यान मराठवाड्यात कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :रेशीमशेतीहवामानतापमान