रब्बी पिकांना सद्य थंडीची आवश्यकता आहे परंतु मागील काही दिवस अवकाळी पाऊस आणि सद्यस्थितीतील ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांत रोग, किडी व इतर समस्या दिसत आहेत यावर उपाययोजना कशा कराल? रब्बीतील प्रमुख पिकांसाठी कृषी सल्ला.
कापूस वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी भिजलेल्या कापसाची वेचणी कापूस वाळल्यानंतर करावी व वेचणी केलेला कापूस वेगळा साठवावा. मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकात बॉड सड दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम १२.६% लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% ६ मिली किंवा सायपरमेथ्रीन २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
तूरमागील आठवड्यात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामुळे उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकात फुलगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एन.ए.ए ४ मिली + १० मिली बोरॉन प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ % ४.४ ग्रॅम + मेटॅलॅक्झील मॅनकोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
हरभरामागील आठवड्यात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ट्रायकोडर्मा या जेविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी करावी किंवा आळवणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकातील घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात प्रति एकरी ०२ कामगंध सापळे व १० पक्षी थांबे उभारावेत. रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ % ४.४ ग्रॅम किंवा फ्लुबेंडामाईड ३९.३५ एससी ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
हळदमागील आठवड्यात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हळद पिकातील पानावरील ठिपके या रोगाच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२% डायफेनकोनॅझोल ११.४ एस सी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्टिकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकातील कंद सड याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील ४% मॅनकोझेब ६४% २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
रब्बी ज्वारी३५ किलो युरियाची मात्रा देवून कोळपणीद्वारे ज्वारीच्या ताटाला माती लावून घ्यावी. सद्यस्थितीत रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करता येते परंतू पेरणीपूर्वी थायमिथॉक्झाम ३० एफएस १० मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ४८ एफएस १२ मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करून पेरणी करावी. ज्वारी पिकावरील खोडमाशी, खोडकिडी व लष्करी अळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी नोमुरीया रिलाई ४० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा थायमिथॉक्झाम १२.६% + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
गहूबागायती गहू उशीरा पेरणी १५ डिसेंबर पर्यत करता येते. उशीरा पेरणीसाठी व कमी पाण्यावर येणाऱ्या फुले नेत्रावती व फुले सात्वीक या वाणांची निवड करावी.संत्रा/मोसंबीवादळी वारा, पाऊस झालेल्या संत्रा/मोसंबी बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी व त्या जागी बोर्डोपेस्ट लावावी. सद्यस्थितीत संत्रा, मोसंबी, लिंबू या फळपिकामध्ये फळधारणा झालेली असल्यास एन.ए.ए ४ मिली + १३:००:४५ या खताची १५०-२०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
ग्रामीण कृषि मौसम सेवाअखिल भारतीय समन्वयीत कृषि हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी