Lokmat Agro >शेतशिवार > रोजगार हमी योजनेतून जॉबकार्ड कसे काढावे?

रोजगार हमी योजनेतून जॉबकार्ड कसे काढावे?

How to withdraw Job Card from Employment Guarantee Scheme? | रोजगार हमी योजनेतून जॉबकार्ड कसे काढावे?

रोजगार हमी योजनेतून जॉबकार्ड कसे काढावे?

काय कागदपत्रे लागतात? काय आहे प्रक्रीया?

काय कागदपत्रे लागतात? काय आहे प्रक्रीया?

शेअर :

Join us
Join usNext

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत  भारतातील गरीब कुटुंबांना रोजगारासाठी जॉबकार्ड दिले जाते. काम हवे असणाऱ्या इच्छूक व्यक्तीला या कार्डच्या सहाय्याने रोजगार हमीतून काम मिळते.

काय असते या जॉब कार्डवर?

  • नरेगाच्या जॉब कार्डचे लाभार्थी असणाऱ्या कुटुंबांच्या कामाची संपूर्ण माहिती या जॉब कार्डमध्ये दिलेली असते. 
  • या कार्डवर गाव आणि शहरातील कुटंबे जोडलेली असतात. या यादीत दरवर्षी नवीन लाभार्थी जोडले जात असतात.


कसे काढता येईल जॉब कार्ड?

  • जॉब कार्डसाठी नोंदणी करायची असेल तर तसा अर्ज स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये करता येतो.
  • तुम्हाला हा अर्ज तीन प्रकारे करता येतो. विहित फॉर्म भरून, साध्या कागदावर किंवा तोंडी पद्धतीने.
  • या योजनेअंतर्गत एक युनिट म्हणून कुटुंबांना नोंदणी करण्याचा अधिकार आहे.
  • यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारा फॉर्म प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध आहे.हा फॉर्म निशुल्क आहे.
     

काय कागदपत्रं लागतात?

मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड घेण्यासाठी काही कागदपत्रं लागतात. त्याआधारे हा अर्ज पडताळून लाभार्थ्याला काम मिळते.
 
-लाभार्थ्याचा पासपोर्ट साइज फोटो.
-आधार कार्डची प्रत
-बँक पासबूकची प्रत
-रेशनकार्डची प्रत
-ओळखपत्र

कसा करावा अर्ज?

  • जॉब कार्डसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही कामाची मागणी केलेल्या तारखेची पावती तुम्हाला मिळाली पाहिजे.
  • कामाची मागणी केल्यापासून १५ दिवसांच्या आत तुम्हाला काम मिळाले पाहिजे.
  • तुम्हाला वैयक्तिकरित्या किंवा गटातही काम करता येऊ शकते.
  • तोंडी, टेलिफोनवर, ऑनलाइन पोर्टलद्वारे आणि लेखी अर्जाद्वारे विविध पद्धतींद्वारे अर्ज केला जाऊ शकतो.
  • रोजगार प्रक्रियेदरम्यान कामगाराद्वारे रोजगाराची वेळ आणि कालावधी निर्दिष्ट केला जाऊ शकतो. तथापि, किमान 14 दिवसांचा रोजगार अनिवार्य आहे.
  • एक प्रगत अर्ज किंवा एकापेक्षा जास्त अर्ज कर्मचार्‍याकडून वेगळ्या कालावधीत रोजगारासाठी सबमिट केले जाऊ शकतात.


नरेगा जॉब कार्डचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील कुटुंबांना आर्थिक वर्षात किमान १०० दिवस मजुरीचा रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या उपजीविकेची सुरक्षितता वाढवणे आहे. ही योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून राबवण्यात येते.

नरेगा जॉब कार्ड यादी कशी पहावी?

नरेगा ही केंद्र सरकारची योजना आहे. मनरेगा अंतर्गत रोजगार मिळण्यासाठी हे जॉब कार्ड अतिशय महत्वाचे आहे. या यादीत नाव आहे की नाही हे तपासणे आता सोपे आहे. ही प्रक्रीया ऑनलाइन करण्यात आल्याने तुम्हाला ही यादी डाऊनलोडही करता येणार आहे. नरेगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला जॉब कार्ड यादी पाहता येईल.

Web Title: How to withdraw Job Card from Employment Guarantee Scheme?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.