Lokmat Agro >शेतशिवार > खरीपातील पिकांचे खत व्यवस्थापन कसे कराल ?

खरीपातील पिकांचे खत व्यवस्थापन कसे कराल ?

How will you manage the fertilizer of Kharif crops? | खरीपातील पिकांचे खत व्यवस्थापन कसे कराल ?

खरीपातील पिकांचे खत व्यवस्थापन कसे कराल ?

शेतकरी बांधवानी आपण घेतलेल्या खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचा संतुलित (योग्य प्रमाणात) वापर करावा. त्याचप्रमाणे किमान वर्षातून एकदा शेणखतासारख्या वरखतांचाही (हेक्टरी १२/१५ टन) आवर्जून वापर करावा

शेतकरी बांधवानी आपण घेतलेल्या खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचा संतुलित (योग्य प्रमाणात) वापर करावा. त्याचप्रमाणे किमान वर्षातून एकदा शेणखतासारख्या वरखतांचाही (हेक्टरी १२/१५ टन) आवर्जून वापर करावा

शेअर :

Join us
Join usNext

ज्याप्रमाणे आजाराकरिता डॉक्टरांनी दिलेली गोळ्या औषधे आपण योग्य वेळी, योग्य प्रमाणात घेऊन आपली तब्येत चांगली करतो अगदी त्याचप्रमाणे पिकांसाठीही रासायनिक खतांचा वापर करणे गरजेचे असते. पिकांना त्यांच्या योग्य वाढीच्या अवस्थेत कृषितज्ञांनी शिफारस केलेली मात्रा योग्य प्रमाणात दिल्यास पिकांची जोमदार वाढ होऊन भरघोस पिक उत्पादन तर मिळतेच परंतु त्याचबरोबर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनी खराब होण्याचा प्रकारही होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवानी आपण घेतलेल्या खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचा संतुलित (योग्य प्रमाणात) वापर करावा. त्याचप्रमाणे किमान वर्षातून एकदा शेणखतासारख्या वरखतांचाही (हेक्टरी १२/१५ टन) आवर्जून वापर करावा जेणेकरून जमिनीचा पोत चांगला राहण्यास मदत होते.

पिकांसाठी सरळ खते वापरत असताना युरिया खतात ४६% नत्र असते (त्यासाठी २.१७ X शिफारशीत नत्र), सिंगल सुपर फॉस्फेट खतात १६% स्फूरद (६.२५ X शिफारशीत स्फूरद) व म्यूरेट ऑफ पोटॅश या खतात ५८% पालाश (१.७२ X शिफारशीत पालाश) असते. त्याकरिता खरिप पिकांना सरळ खताची  मात्रा देताना कंसात दिल्याप्रमाणे अनुक्रमे नत्र, स्फूरद व पालाश शिफारशी प्रमाणे वापरावे. सरळ खतानंतर डीएपी हे संमिश्र खत शेतकरी बांधव जास्त प्रमाणात वापरतात.डीएपी खतात १८% नत्र व ४६% स्फूरद असते, नत्र व स्फूरदची शिफारशीत मात्रा खरिप पिकांना देताना योग्य प्रमाणात डीएपी खत वापरावे.

खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचे  व्यवस्थापन:
अ) कडधान्ये:

१) मूग/उडीद 
मूग व उडीद पिकांसाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी २० कि. नत्र व ४० कि. स्फूरद देण्याची शिफारस असून ही मात्रा मूग/उडीद पिकास १०० किलो डीएपी  खतातून द्यावी.

२) तूर
तूर पिकासाठी पेरणीच्यावेळी प्रतिहेक्टरी २५ कि. नत्र व ५० कि. स्फूरदची शिफारस असून ही मात्रा प्रति हेक्टरी १२५ कि. डीएपी खतातून द्यावी.

ब) गळीत धान्य:

१) सोयाबीन
सोयाबीन पिकासाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी ५० कि. नत्र (११० कि. युरिया), ७५ कि. स्फूरद (४५० कि. सिंगल सुपर फॉस्फेट) व ४५ कि. पालाश (७५ कि. म्यूरेट ऑफ  पोटॅश) देण्याची शिफारस आहे.

२) सूर्यफूल
- कोरडवाहू सूर्यफूल पिकास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी ५० कि. नत्र (११० कि.युरिया), २५ कि.स्फूरद (१५० कि. सिंगल सुपर फॉस्फेट) व २५ कि.पालाश (४० कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
- बागायती सूर्यफूल पिकास पेरणीच्यावेळी प्रति हेक्टरी ३० कि. नत्र (६५ कि. युरिया), ६० कि. स्फूरद (३७५ कि. सिगल सुपर फॉस्फेट), ६० कि.पालाश (१०० कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) आणि पेरणीनंतर ३० दिवसांनी ३० कि. नत्र (६५ कि. युरिया) द्यावे.

क) तृणधान्ये

१) खरिप ज्वारी
ज्वारी पिकास खरिप हंगामात पेरणीच्यावेळी प्रति हेक्टरी ५० कि. नत्र (११० कि. युरिया ), ५० कि. स्फूरद (३०० कि. सिंगल सुपर फॉस्फेट), ५० कि. पालाश (८५ कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) आणि पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० कि. नत्र (११० कि. युरिया) जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे.

२) बाजरी
बाजरी पिकास पेरणीच्यावेळी प्रति हेक्टरी २५ कि. नत्र (५५ कि. युरिया), २५ कि. स्फूरद (१५० कि. सिंगल सुपर फॉस्फेट), २५ कि. पालाश (४० कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) आणि पेरणी नंतर ३० दिवसांनी २५ कि. नत्र (५५ कि. युरिया) द्यावे.

३) मका
मका पिकास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी ४० कि. नत्र (८८ कि. युरिया), ६० कि. स्फूरद (३७५ कि. सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ४० कि. पालाश (७० कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पेरणी नंतर ३० दिवसांनी ४० कि. नत्र (८८ कि. युरिया) आणि पेरणी नंतर ४०/४५ दिवसांनी नत्राचा  तिसरा  हप्ता, ४० कि. नत्र (८८ कि. युरिया) द्यावा.

सरळ खतांमध्ये दर्शविल्याप्रमाणे नत्र, स्फूरद व पालाशचे प्रमाण प्रत्यक्षात तेवढेच आढळते आणि मिश्र खतांच्या तुलनेत सरळ खते शेतकरी बांधवाना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात.

संकलन:
कल्याण देवळाणकर, नाशिक
७५८८०३६५३२
 

Web Title: How will you manage the fertilizer of Kharif crops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.