शरद देवकुळे
पळशी : माण तालुक्यातील मार्डी पळशी, माळीखोरा आदी परिसरात दरवर्षी डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकऱ्यांनी शेकडो एकरावर डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
पण सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची भीषण टंचाई भासत असून डाळिंब बागा जगवणे उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे पाणीच नसल्याने विकतचे पाणी आणून ठिबक सिंचनद्वारे बागांना सोडावे लागत आहे.
पाण्याअभावी बागा आता सलाईनवर असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी चांगला दमदार पाऊसच झाला नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरातील ओढे, नाले, तलाव कोरडे ठाक पडले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागत आहे.
पाऊस नसल्याने खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगामही वाया गेला असून शेतातून कोणतेच पीक हाती लागले नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, मोठ्या जिद्दीने लागवड केलेल्या डाळिंब बागेसाठी पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
मार्डी, पळशी परिसरात शेकडो एकरावर डाळिंबाच्या बागा आहेत. पण पाणी नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागा पाण्याअभावी जळून जात असल्याचे पीक हाती लागले नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.
ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, मोठ्या जिद्दीने लागवड केलेल्या डाळिंब बागेसाठी पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मार्डी, पळशी परिसरात शेकडो एकरावर डाळिंबाच्या बागा आहेत.
पण पाणी नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागा पाण्याअभावी जळून जात असल्याचे नातेवाइकांकडून हातउसने पैसे घेऊन विकतचे पाणी विहिरीत सोडून ठिबक सिंचनद्वारे डाळिंब बागांना देत आहेत.
सध्या पाच हजार लिटरच्या लहान टँकरसाठी एक हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत असून, या पाण्यावर कशीतरी पाचशे झाडे जगवता येत आहेत. सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असून, पाणी कमी पडत असल्याने पाच ते सहा दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे लागत असल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे.
बागा जळू लागल्याने चिंता..!
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असून, परिसरातील तरुण नोकरीच्या मागे न लागता पारंपरिक शेतीला बगल देत डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत; पण पाणी नसल्याने बागा जळू लागल्याने बँकांची कर्जे फेडायची कशी, अशी चिता सध्या शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
सध्या भीषण पाणीटंचाई भासत असून, पाणी विकत घेऊन बागा जगवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बागा जगविण्यासाठी शासनाने मदत करावी. - शिवाजी पोळ, शेतकरी, मार्डी