यंदा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत असताना जगावर भूकसंकट कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कृषी संघटनेच्या अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी अन्न मिळत असल्याचे या अहवालातून दिसून येत आहे. भूकसंकट दक्षिण आशियात ही समस्या अधिक गंभीर असल्याचे हा अहवाल सांगतो. करोनाच्या तूलनेत २०२२ मध्ये साडेपाच कोटींपेक्षा अधिक लोक कुपोषित आढळून आले आहेत.
जागतिक भूक निर्देशांकातही भारताचा १२५ देशांमधून १११ क्रमांक भूकेची गंभीर पातळी दर्शवतो. देशात कुपोषणाचे प्रमाण १६.६ टक्के आणि पाच वर्षाखालील मृत्यूदर ३.१ टक्के आहे. १५ते २४ वयोगटातील महिलांमध्ये अशक्तपणाचं प्रमाण तब्बल ५८.१ टक्का आहे.
अन्नसुरक्षा हा सध्या सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये चर्चेसाठी कळीचा मुद्दा आहे.असे असताना संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालातही अन्न पुरवठा, पोषक अन्नाची आवश्यकता, अन्नधान्याचा वापर या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. या अहवालानुसार दक्षिण आशियातील देशांमध्ये भूकेची समस्या मोठी गंभीर होत चालली आहे. पुरुषांच्या तूलनेत महिलांना कमी अन्न मिळत असल्याचे यात समोर आले आहे. जगातील ४२ टक्के महिलांवर अन्नसुरक्षेचे संकट आहे.
काय आहेत भूकेच्या समस्येमागील कारणे?
- अन्न खरेदी करण्याची क्षमता नसणे
- पैसे कमी दर्जाचे अन्न खाणे
- महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी अन्न मिळते
- इंधन, अन्न, खतांच्या किमती वाढल्याने अडथळे
- अन्नपुरवठ्याच्या वितरणात असमानता
संयुक्त राष्टांनी भूक व अन्न समस्येवर सांगितले आहेत हे उपाय?
१. संघर्ष आणि उपासमारीचे दूष्टचक्र खंडित करणे२.हवामान बदलास अनुकुल जीवनशैलीत लवचिकता निर्माण करणे३.गरिबी आणि विषमतेवर मात करणे४. ग्रामिण शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यास मदत करणे५. अन्न कचरा कमी करून अन्नाचे नुकसान टाळणे६. कुपोषणाच्या समस्या दूर करणे