मुंबई : राज्य सरकारने गुरुवारी १० आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. त्यात अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आय. ए. कुंदन आणि वेणुगोपाल रेड्डी यांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आता याच पदावर वन विभागात गेले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आय.ए. कुंदन यांची याच पदावर कामगार विभागात बदली झाली.
वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी याच पदावर उच्च व तंत्रशिक्षण विभागात बदलून गेले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आता सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव असतील. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव असतील.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे आता याच पदावर कृषी विभागात बदलून गेले आहेत. उच्च शिक्षा अभियानाचे संचालक निपुण विनायक हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे नवीन सचिव असतील.
सातारा जिल्हाधिकारी डुड्डी आता पुण्यात
■ माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्याकडे आता अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिवपद देण्यात आले आहे.
■ साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी आता पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी असतील. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील हे आता सातारचे नवे जिल्हाधिकारी असतील.
■ पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख या पदावर पुणे येथे करण्यात आली. हिरालाल सोनावणे हे नवे क्रीडा आयुक्त असतील.
या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अधिकाऱ्याचे नाव | सध्याचे पद | बदलीनंतरचे पद |
मिलिंद म्हैसकर | अति. मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य | अति. मुख्य सचिव, वने |
आय. ए. कुंदन | अति. मुख्य सचिव, शालेय शिक्षण | अति. मुख्य सचिव, कामगार |
वेणुगोपाल रेड्डी | अति. मुख्य सचिव, वने | अति. मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण |
विनिता वेद सिंगल | प्रधान सचिव, कामगार | प्रधान सचिव, पर्यावरण |
हर्षदीप कांबळे | महाव्यवस्थापक, बेस्ट | प्रधान सचिव सामाजिक न्याय |
विकासचंद्र रस्तोगी | प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण | प्रधान सचिव, कृषी |
जयश्री भोज | सचिव, माहिती व तंत्रज्ञान | सचिव, अन्न व नागरी पुरवठा |
जितेंद्र डुड्डी | जिल्हाधिकारी सातारा | जिल्हाधिकारी पुणे |
निपुण विनायक | संचालक, उच्च शिक्षा अभियान | सचिव, सार्वजनिक आरोग्य |
संतोष पाटील | मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जि.प | जिल्हाधिकारी, सातारा |
सुहास दिवसे | जिल्हाधिकारी पुणे | जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे |
हिरालाल सोनावणे | नियुक्तीच्या प्रतीक्षेत | आयुक्त, युवक व क्रीडा |
अधिक वाचा: Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी; ह्या महिला ठरणार अपात्र