राजरत्न सिरसाट
अकोला : शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न दुप्पट करण्यावर केंद्र शासनाचा प्रयत्न असून, यानुषंगाने देशात विशेष संशोधन (Resarch) प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात कृषी उत्पादनाच्या अवशेषाचा वापर करून २०० जिगावॉटपर्यत जैव उर्जा निर्मिती केली जाणार असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR Resarch) कृषी अभियांत्रिकी विभागाचे सहायक महाव्यस्थापक के. टी. सिंग, नवी दिल्ली यांनी मंगळवारी 'लोकमत ऍग्रो'शी बोलताना दिली.
उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणता प्रकल्प आहे?
सिंग- केंद्रिय नवीन व नवीनकरणीय उर्जा मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादनाच्या अवशेषावर प्रकिया करणारे उद्योग सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यासाठी सर मंत्रालय अर्थसाहाय उपलब्ध करून देत आहे. देशात सध्या ५२ ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
या प्रकल्पातून काय तयार होणार?
सिंग- शेतकरी (farmer) पीक काढल्यानंतर पिकांचे उरलेले अवशेष जाळतात किंवा गुरांना वैरण म्हणून वापरतात. बऱ्याच पिकांचे अवशेष गुरे खात नाहीत. त्यामुळे ते जाळले जातात, यामुळे कॉर्बनडाय ऑक्साइड तयार होतो व त्यांचा विपरीत परिणाम वातावरण, पर्यावरणवर होतो. ग्लोबलवॉर्मिंगचा प्रश्न यातूनच निर्माण झाला आहे. जैव, अपारंपरिक उर्जेचा वापर करून कृषी अवशेषापासून जळतनासाठी लागणाऱ्या विटा व इतर साहित्य तयार करण्यात येत आहे.
यापासून कोणते उत्पादन घेऊ शकतो ?
सिंग- कृषी मालाच्या अवशेषापासून इथेनॉल यासह जैव उर्जा निर्माण होते. इथेनॉलचा पेट्रोलमध्ये १० टक्के वापर करण्याची परवानगी आहे. ही वाढवून २० टक्के करण्याचे प्रयत्न आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. नॅनो टेक्नालॉजीचा वापर करण्यात येत आहे. हायड्रोजनमधूनसुध्दा उर्जा तयार केली जात असून, याचा साठा करण्यात येत आहे. ज्यावेळी ऊन नसेल त्यावेळी ही वीज वापरता येणार आहे.
दाम दुप्पट कसे होतील ?
सिंग-शेतीतील उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी संशोधन (Resarch) करण्यात येत असून, कृषी मालाच्या अवशेषापासून जैव उर्जा निर्मितीसाठी संशोधन सुरू करण्यात आले आहे. या बॉयोगॅससाठी वापर करण्यात येत असून, वाहनाला लागणारे ग्रीस तयार करण्यात येत आहे.
सध्या प्रकल्प कुठे सुरू आहेत?
देशात पंजाब, हरयाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यात शेतकऱ्यांकडून जैव निर्मिती केली जात आहे. तसेच पंतनगर येथे शेतकऱ्यांनी उद्योग सुरू केले आहेत. भोपाळला एनर्जी इनक्लेव सुरू करण्यात आले आहे. १७ केंद्र सुरू आहेत.
यातून रोजागराच्या संधी आहेत?
यातून रोजगाराच्या संधी असून, उद्योग उभारता येतात. त्यासाठी अर्थसहायदेखील उपलब्ध होते.
हे ही वाचा सविस्तर : Bird flu: कावळ्यांद्वारे 'बर्ड फ्ल्यू' धडकला ! काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर