Join us

ऊसावरील पांढरी माशी आणि पायरीला ओळखा आणि वेळीच नियंत्रण करा

By बिभिषण बागल | Published: August 02, 2023 12:00 PM

ऊसावर पायरीला आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ऊसावरील पांढरी माशी ही किड शेतकऱ्याला नवीन असल्यामुळे शेतकरी तिला लोकरी मावा किंवा पिठ्या ढेकूण संबोधत आहेत.

पावसाने ताण दिला आणि तापमानात अचानक वाढ झाली तर यामुळे ऊसावर पायरीला आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ऊसावरील पांढरी माशी ही किड शेतकऱ्याला नवीन असल्यामुळे शेतकरी तिला लोकरी मावा किंवा पिठ्या ढेकूण संबोधत आहेत. 

पायरीलापायरीलाची मादी पानाच्या खालच्या बाजूला शिरेजवळ पिवळसर रंगाची अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणारी पिले पांढरट रंगाची असतात त्यांच्या पाठीवर विशिष्ट असे पंखासारखे अवयव असतात. त्याचसोबत त्यांच्या शरीरावर मेणासारख्या पदार्थाचा थर असतो. प्रौढ हे पाचटाच्या आकाराचे असतात.नुकसानीचा प्रकारः- प्रौढ आणि पिले ऊसाच्या कोवळ्या पानातील रस शोषून घेतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर पाने पिवळी पडतात. सतत पानामधून रस शोषण केल्यामुळे ऊसाची शेंड्याकडील पाने वळून जातात व ऊसाचे डोळे फुटण्यास सुरवात होते.- पिले आणि प्रौढ अंगातून साखरेसारखा चिकट द्रव बाहेर सोडतात. या चिकट साखरेसारख्या पदार्थावर काळ्या रंगाची कॅप्नोडियम बुरशी वाढते व पर्यायाने प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. पायरीला मुळे जवळपास २८% पर्यंत उत्पादनात घट येते.नियंत्रणाचे उपायः१) सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली ऊसातील पाचट काढून घ्यावे.२) नत्रयुक्त खतांचा वापर शिफारशीप्रमाणे करावा.३) परोपजीवी मित्रकिटकांचे शेतात संगोपन करावे. या मध्ये इपिरिकॅनिया मेलानोल्युका (Epiricania melanoleuca) या मित्रकिडीचे हेक्टरी ५ हजार कोष प्रसारित करावेत.४) किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा क्रिया मंदावते.अधिक दिसत असल्यास किटनाशकाची फवारणी करावी.

पांढरी माशीमादी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ अंडी प्रमाणे द्यावी. घालते. अंड्यातून बाहेर पडणारी पिले पिवळ्या रंगाची असतात. प्रौढ माशी पिवळ्या रंगाची असून अंगावर मेणासारखे आवरण असते.नुकसानीचा प्रकार:- पिले पानाच्या मागे राहून रस शोषण करतात. सतत पानातून रस शोषण केल्यामुळे ऊसाची पाने पिवळसर गुलाबी दिसतात व कालांतराने वाळून जातात.- प्रादुर्भाव झालेल्या पानावर पांढऱ्या व काळ्या रंगाचे ठिपके दिसतात.- पिले अंगातून साखरेसारखा चिकट द्रव पानांवर सोडतात. त्यामुळे पानांवर काळ्या रंगाची कॅप्नोडियम बुरशी वाढते पर्यायाने प्रकाशसंश्लेषणनियंत्रणाचे उपायः१) ऊस पिकामध्ये सतत पाणी साठत असल्यास चर काढून देऊन पाण्याचा निचरा करावा. त्याच बरोबर पाण्याचा ताण पडत असेल तर पिकास पाणी२) लागण व खोडाव्यास खतांची मात्रा शिफारशी३) सुरवातीच्या काळात किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो. अशावेळी प्रदूर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.४) ऊसाची लागण पट्टा पद्धत किंवा रुंद सरी पद्धतीने केल्यास पिकात हवा खेळती राहते त्याच सोबत नियंत्रणाचे उपाय करणे देखील सोपे जाते.५) पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी काही चाचण्या मध्ये व्हर्टिसिलियम लेकानी या जैविक किटकनाशकाचा वापर फायदेशीर आढळून आला आहे. 

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणऊसपीकशेतकरीशेती