सध्या सर्वत्र फळांचा राजा आंबा बाजारात दिसू लागला आहे. आपण अनेकदा मोठ्या आशेने हे आंबे विकत घेतो आणि घरी घेऊन जातो. मात्र कधी कधी हे आंबे चवीला खूप चांगले निघतात, तर कधी कधी आंबट आंबे आपल्या पदरी पडतात मग ते आंबे नाईलाजास्तव घरातील मुले आणि काही वेळा आपण सुद्धा डस्टबिनमध्ये फेकून देत असतो.
मात्र जर तुम्हाला आंबट आणि गोड आंबा कसा ओळखायचा. हे माहित असलं तर तुमची फसवणूक होणारच नाही. यासाठी बाजारातील गोड आणि आंबट आंब्यामध्ये फरक कसा करावा आणि ते खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे समजून घेऊया.
स्पर्श : आंबे गोड आहेत की आंबट हे तुम्ही आंब्यांना स्पर्श करून ओळखू शकता. जर आंब्याचा स्पर्श थोडा मऊ असेल तर याचा अर्थ असा होतो की तो गोड असेल. पण आतून खूप कठिण दिसत असेल तर तो आंबट असला पाहिजे.
सुगंध : जर तुम्हाला गोड आंबा घ्यायचा असेल तर त्याच्या देठाचा वास घ्या. आंब्याला वास असेल तर तो पिकलेला आणि गोडही आहे. मात्र कच्च्या आंब्याला वास येत नाही. एवढेच नाही तर केमिकल टाकून पिकवलेल्या आंब्यालाही वास येत नाही.
गोलाकारपणा : जे आंबे किंचित गोलाकार असतात आणि जास्त वाकलेले नसतात, ते आंबे बरेचदा गोड असतात. पण जर आंबे खूप वक्र असतील आणि खूप सुंदर दिसत असतील तर ते फार पिकलेले किंवा गोड नसतील.
खड्डे पडलेले आंबे : जर आंबे एकमेकांच्या वजनामुळे चिरडले गेले असतील आणि मऊ झाले असतील तर ते पिकलेले आहेत असे आवश्यक नाही. परंतु ते लवकर खराब होऊ शकतात आणि एकत्र ठेवल्यास इतर आंबेही खराब करू शकतात.
हेही वाचा - शेळीपालनात उत्पन्नाची हमी; वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय