Lokmat Agro >शेतशिवार > मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस नसेल तर पेरणीची घाई नको, या जिल्ह्यांनी घ्यावी काळजी

मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस नसेल तर पेरणीची घाई नको, या जिल्ह्यांनी घ्यावी काळजी

If there is no rain suitable for sowing in Marathwada, there should be no rush for sowing, these districts should take care | मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस नसेल तर पेरणीची घाई नको, या जिल्ह्यांनी घ्यावी काळजी

मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस नसेल तर पेरणीची घाई नको, या जिल्ह्यांनी घ्यावी काळजी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना कृषीसल्ला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना कृषीसल्ला

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस नसेल तर पेरणीची घाई न करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.

ज्या तालुक्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस म्हणजे, ७५ ते १०० मिमी एवढा झाल नसल्यास पेरणीची घाई करू नये . मान्सूनचा पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यांनी घ्यावी काळजी?

परभणी जिल्हा : पूर्णा, पालम ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

कसे राहणार हवामान?

मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या स्वरुपाच्या पावसची शक्यता आहे. दि २३ व २४ जून रोजी काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम वाऱ्यांच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title: If there is no rain suitable for sowing in Marathwada, there should be no rush for sowing, these districts should take care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.