Join us

मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस नसेल तर पेरणीची घाई नको, या जिल्ह्यांनी घ्यावी काळजी

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 18, 2024 3:22 PM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना कृषीसल्ला

मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस नसेल तर पेरणीची घाई न करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.

ज्या तालुक्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस म्हणजे, ७५ ते १०० मिमी एवढा झाल नसल्यास पेरणीची घाई करू नये . मान्सूनचा पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यांनी घ्यावी काळजी?

परभणी जिल्हा : पूर्णा, पालम ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

कसे राहणार हवामान?

मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या स्वरुपाच्या पावसची शक्यता आहे. दि २३ व २४ जून रोजी काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम वाऱ्यांच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठहवामानखरीपपेरणी