Lokmat Agro >शेतशिवार > जांभूळ खाऊन बिया फेकत असाल तर थांबा ? जांभूळ बिया आहेत आरोग्यास जांभळापेक्षा अधिक फायद्याच्या

जांभूळ खाऊन बिया फेकत असाल तर थांबा ? जांभूळ बिया आहेत आरोग्यास जांभळापेक्षा अधिक फायद्याच्या

If you are throwing seeds after eating jambhul, stop? jamun seeds are more beneficial for health than jambhul | जांभूळ खाऊन बिया फेकत असाल तर थांबा ? जांभूळ बिया आहेत आरोग्यास जांभळापेक्षा अधिक फायद्याच्या

जांभूळ खाऊन बिया फेकत असाल तर थांबा ? जांभूळ बिया आहेत आरोग्यास जांभळापेक्षा अधिक फायद्याच्या

जांभळासोबत जांभूळ बिया (Jambhul Seeds) देखील आरोग्यवर्धक (Healthier) आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? जांभळाच्या बियांचे विविध औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वे आहेत. ह्यांचे सेवन देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

जांभळासोबत जांभूळ बिया (Jambhul Seeds) देखील आरोग्यवर्धक (Healthier) आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? जांभळाच्या बियांचे विविध औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वे आहेत. ह्यांचे सेवन देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

शेअर :

Join us
Join usNext

जांभूळ नाव ऐकताच खावे वाटणारे रसरसीत फळ. मात्र जांभळासोबत जांभूळ बिया देखील आरोग्यवर्धक आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? जांभळाच्या बियांचे विविध औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वे आहेत. ह्यांचे सेवन देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. 

अशा या गुणकारी जांभळाच्या बियांचे विविध गुणकारी फायदे या लेखातून जाणून घेऊया.

जांभळाच्या बियांचे पोषक तत्वे (Nutrients facts of jambhul seeds)

१. प्रथिने (Proteins) : जांभळाच्या बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. ह्यामुळे स्नायूंची वाढ होते आणि शरीराच्या विकासाला मदत होते.

२. फायबर (Dietary Fiber) : जांभळाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ह्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

३. कॅल्शियम (Calcium) : कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जांभळाच्या बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते.

४. लोह (Iron) : जांभळाच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करते.

५. अँटीऑक्सीडंट्स (Antioxidants) : जांभळाच्या बियांमध्ये अँटीऑक्सीडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.

जांभळाच्या बियांचे आरोग्यवर्धक फायदे (Health benefits of jamun seeds)

१. मधुमेह नियंत्रण : जांभळाच्या बियांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते. ह्यातील हायपोग्लायसेमिक गुणधर्मामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरते.

२. पचनसंस्थेचे आरोग्य : जांभळाच्या बियांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था सुधारते. ह्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

३. हृदयाचे आरोग्य : जांभळाच्या बियांमध्ये अँटीऑक्सीडंट्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. ह्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते.

४. वजन नियंत्रण : जांभळाच्या बियांचे सेवन केल्याने तृप्तीची भावना निर्माण होते, ज्यामुळे अन्नाचे सेवन कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

५. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : जांभळाच्या बियांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ह्यातील विविध पोषक तत्वे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात.

६. त्वचेचे आरोग्य : जांभळाच्या बियांमध्ये अँटीऑक्सीडंट घटक असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारतात. ह्यामुळे त्वचेची चमक टिकून राहते आणि त्वचाविकारांपासून बचाव होतो.

७. मूत्रपिंडांचे आरोग्य : जांभळाच्या बियांचे सेवन केल्यास मूत्रपिंडांचे आरोग्य सुधारते. ह्यामुळे मूत्रपिंडातील विकार कमी होण्यास मदत होते.

८. कर्करोगविरोधी गुणधर्म : जांभळाच्या बियांमध्ये असलेल्या अँटीऑक्सीडंट्समुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते. ह्यामुळे कर्करोगाच्या धोक्यापासून बचाव होतो.

अशा या जांभळाच्या बियांचे सेवन केल्याने अनेक पोषक तत्वे आणि आरोग्यवर्धक फायदे मिळतात. ह्यांचे नियमित सेवन केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, तसेच पचनसंस्था सुधारते आणि विविध रोगांपासून बचाव होतो. त्यामुळे जांभळाच्या बियांचा आपल्या आहारात आवश्य समावेश करावा.

डॉ. सोनल रा. झंवर 
सहाय्यक प्राध्यापक 
एम . जी . एम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर

Web Title: If you are throwing seeds after eating jambhul, stop? jamun seeds are more beneficial for health than jambhul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.