Lokmat Agro >शेतशिवार > वीज बिलासाठी हे पर्याय निवडाल तर बिलात मिळेल १० रुपयांची सवलत; वाचा सविस्तर

वीज बिलासाठी हे पर्याय निवडाल तर बिलात मिळेल १० रुपयांची सवलत; वाचा सविस्तर

If you choose this option for your electricity bill, you will get a discount of Rs 10 on your bill; Read in detail | वीज बिलासाठी हे पर्याय निवडाल तर बिलात मिळेल १० रुपयांची सवलत; वाचा सविस्तर

वीज बिलासाठी हे पर्याय निवडाल तर बिलात मिळेल १० रुपयांची सवलत; वाचा सविस्तर

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमध्ये वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे विभागातील तब्बल २ लाख ११३ वीज ग्राहकांनी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ४० लाख १३ हजार ५६० रुपयांचा फायदा होत आहे. तर राज्यात आतापर्यंत ५ लाख २४५ पर्यावरणस्नेही वीज ग्राहक या योजनेत सहभागी झाले असून, यात सर्वाधिक ४० टक्के ग्राहक पुणे विभागातील आहेत.

महावितरणच्या राज्यातील १६ परिमंडळांपैकी सर्वाधिक पुणे परिमंडळामध्ये १ लाख ३४ हजार ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. 'गो-ग्रीन' योजनेतून कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाइल अॅप व वेबसाइटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे.

इमेलच्या पर्यायास १० रूपये सवलत
● महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.
● पणे प्रादेशिक विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील वीज ग्राहकांचा सर्वाधिक प्रतिसाद चांगला आहे.
● गो-ग्रीन मधील ग्राहकांना 'ई-मेल' व एसएमएस द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन ऑनलाइनद्वारे त्वरित वीजबिल भरणा करणे शक्य झाले आहे.
● लघुदाब वीज ग्राहकांनी कागदी बिलांचा वापर बंद करून 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुणेचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पुणे प्रादेशिक विभागांतर्गत 'गो-ग्रीन'
योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ३६८ ग्राहक सहभागी झाले आहेत. त्यांचा १ कोटी ७२ लाख ४ हजार १६० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे तर सातारा जिल्ह्यातील १३ हजार १५३ ग्राहकांना १५ लाख ७८ हजार ३६० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार २३१ ग्राहकांना १७ लाख ७ हजार ७२० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १८ हजार ४५ ग्राहकांना २१ लाख ६५ हजार ४०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ११ हजार ३१६ ग्राहकांना १३ लाख ५७ हजार ९२० रुपयांचा वीजबिलांमध्ये वार्षिक फायदा होत आहे.

जतनास योग्य
■ 'गो-ग्रीन मधील ग्राहकांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. त्याची गरजेनुसार केव्हाही प्रिंट काढता येईल.
■ सोबतच वेबसाइटवर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.
'गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी वीज ग्राहकांना महावितरणचे मोबाइल अॅप किंवा वेबसाईट येथे सुविधा उपलब्ध करण्यात आली.

अधिक वाचा: E Peek Pahani : ई-पीक पाहणी करताना बांधावरची झाडे कशी नोंदवाल? पाहूया सविस्तर

Web Title: If you choose this option for your electricity bill, you will get a discount of Rs 10 on your bill; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.