Join us

शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेत नसाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 2:00 PM

पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनचे दर घसरले...

पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले असताना बाजारात भावही कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, भविष्यात शासनाने अनुदान जाहीर केले तर सोयाबीन विक्री केल्याच्या पक्क्या पावतीची गरज भासणार आहे. त्याकरिता सोयाबीन विक्री करताना शेतकऱ्यांनी पक्की पावती घेणे आवश्यक आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पंधरवड्यापासून नवे सोयाबीन उपलब्ध झाले आहे. यंदा समाधानकारक भाव मिळेल अशी आशा होती. मात्र, नवे सोयाबीन बाजारात येताच भावात कमालीची घसरण झाली. एकीकडे उत्पादन घटले असताना दुसरीकडे भावही कोसळले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दिवाळी तोंडावर असल्याने बहुतांश शेतकरी सोयाबीन विक्री करीत आहेत; परंतु व्यापाऱ्यांकडून पक्की पावती दिली जात नसल्याचे चित्र आहे. भविष्यात शासनाने अनुदान जाहीर केले तर पक्क्या पावतीचा विचार होऊ शकतो. त्याकरिता शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केल्यानंतर त्याची पक्की पावती घ्यावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

हिंगोली बाजार समितीअंतर्गत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापायांनी शेतकऱ्यांना हिशेबपट्टी पक्की द्यावी अशा सूचना केल्या जातात. त्यामुळे शेतकयांनी माल विक्री केल्यानंतर त्यांना पक्की पावती देण्यात येते. शेतकऱ्यांनीही पक्या पावतीची मागणी करावी.-नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

सोयाबीनचे दर का घसरले?

नवे सोयाबीन बाजारात आले आहे, तसेच मध्य प्रदेशसह इतर राज्यांतही सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. त्या तुलनेत मात्र मागणी कमी असल्यामुळे सोयाबीनचे दर घसरल्याचे व्यापायांचे म्हणणे आहे.

शासनाचे अनुदान आले तर हवी पक्की पावती

सोयाबीनवर यंदा यलो मोझॅकने हल्ला केला होता. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. आता भावही कवडीमोल मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने अनुदान जाहीर केले तर शेतकऱ्यांकडे सोयाबीन विक्रीची पक्की पावती असणे आवश्यक आहे.

सोयाबीन उत्पादक म्हणतात......

अत्यल्प पावसाचा फटका सोयाबीनला बसला. त्यामुळे उत्पादनात घट झाली आणि भाव कवडीमोल मिळत आहे.

- परमेश्वर कन्हाळे, शेतकरी

सोयाबीनला सध्या मिळणारा भाव शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. किमान ६ हजार रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे.

-शिवचरण गिरी, शेतकरी

सोयाबीनला भाव किती? (प्रति क्विंटल)

तालुकाप्रति क्विंटल भाव
हिंगोली४७६०
वसमत४७८०
औंढा नागनाथ४५९०
कळमनुरी४६९०
सेनगाव४८७०
सिरसम बु.४६७०
आ. बाळापूर४५६०
जवळा बाजार४७८०

 

टॅग्स :सोयाबीनशेतकरीपाऊस