लाडकी बहिण योजनेच्या बऱ्याच महिला लाभार्थींची खाती पोस्टात काढण्यात आली आहेत. लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी रक्कम जर आरडी या योजनेत गुंतवली तर ही योजना तुम्हाला लखपती करू शकते.
भारतीय डाक विभागाची ही आरडी योजना ग्राहकांसाठी मध्यम मुदतीच्या बचतीसाठी उपयुक्त आहे. ह्या योजनेविषयी जाणून घेऊया सविस्तर.
या योजनेत गुंतवणूक करताना ग्राहकांनी सातत्याने ठरावीक रकमेची गुंतवणूक केली तर त्यांना त्यांच्या ठेवींवर भारत सरकारने ठरवलेल्या दरांनुसार गुंतवणूक कालावधीत व्याज मिळते.
जर ग्राहकांनी आरडीमध्ये १२ महिने पैसे भरले असतील तर ते त्यांच्या आरडी खात्यातील शिल्लक ५० टक्के पर्यंत कर्जासाठी पात्र असणार आहेत.
आरडी खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनी कधीही त्यांचे आरडी खाते बंद करू शकतात. आयपीपीबी मोबाइल बँकिंग अॅपद्वारे ऑनलाइन रक्कम भरण्याची सुविधा आहे.
आरडी ठेव योजनेची वैशिष्ट्ये
१) कमीत कमी १०० रुपये भरून खाते काढणे.
२) दरमहा पैसे भरा. ५ वर्षांनी व्याजासहित रक्कम घ्या.
३) तीन वर्षांनंतर खाते मुदतपूर्व बंद करता येते.
४) खाते काढून एक वर्षानंतर ५०% कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
५) डाक विभागाच्या बचत खात्याद्वारे आपोआप दरमहा हप्ता जमा होण्याची सोय.
आरडी पात्रता निकष
१) आरडी ठेव खाते उघडण्यासाठी १८ वर्षांवरील भारतीय नागरिक.
२) दहा वर्षावरील अल्पवयीन मुले त्यांच्या नावावर खाते उघडू शकतात.
३) दहा वर्षांखालील अल्पवयीन मुले त्यांच्या पालकांसह खाते उघडू शकतात.
सध्याचा व्याजदर ६.७० टक्के
१) योजनेचा व्याज दर वार्षिक ६.७० टक्के आहे.
२) वृद्ध लोक आणि बिगर ज्येष्ठ नागरिक दोघेही या व्याजदराच्या अधीन आहेत.
३) पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर सध्याचा व्याज दर ६.७० टक्के वार्षिक आहे (वार्षिक चक्रवाढ).
४) पोस्ट ऑफिसमध्ये आरडी मुदतीपूर्वी काढली जाऊ शकते.
संपर्क
योजनेच्या अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.
अधिक वाचा: E Peek Pahani : राज्यात १०० टक्के पीक पाहणी होणार; आता सहायकांमार्फत ई-पीक पाहणीला सुरूवात