Join us

E-Pik Pahani: विमा, नुकसान भरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:19 AM

विमा तसेच नुकसानभरपाई हवी असेल तर पीक पेरा नोंदणी करणे गरजेचे आहे. ई-पाहणी अॅपवर शेतकऱ्यांनी १ ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करायची आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

विमा तसेच नुकसानभरपाई हवी असेल तर पीक पेरा नोंदणी करणे गरजेचे आहे. ई-पाहणी अॅपवर शेतकऱ्यांनी १ ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करायची आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने आणि पीक विमा व पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ई- पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहण्याची जलद वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामुळे तलाठ्यांचे काम सोपे होणार आहे.

हंगामाची पीक पाहणी करा अपलोड१ ऑगस्ट रोजी पोर्टल सुरू होणार असून शेतकरी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात. जिओ फेन्सिंगच्या बफर अंतराच्या बाहेरून फोटो घेतला तरी पीक पाहणी नोंदविली जाते. १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर अशा ४५ दिवस शेतकरी स्तरावरील पीक पाहणी होणार असून सहायक स्तरावरील पीक पाहणी १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर असा ३० दिवस चालणार आहे.

खातेदारनिहाय पीक पाहणीखातेदारनिहाय पीक पाहणीमुळे पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे.

अॅपवर कशी कराल नोंदणी?ई-पीक पाहणी अॅप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करता येते. ई-पीक पाहणीअंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येते. १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर असे ४५ दिवस शेतकरी स्तरावरील पीक पाहणी होणार आहे. सहायक स्तरावरील पीक पाहणी १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशी ३० दिवस चालणार आहे.

टॅग्स :पीकपीक विमाशेतकरीशेतीपेरणीखरीप