Lokmat Agro >शेतशिवार > ई-केवायसी न केल्याचा फटका; ९४ हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीला मुकणार!

ई-केवायसी न केल्याचा फटका; ९४ हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीला मुकणार!

Impact of not doing e-KYC; 94 thousand farmers will miss the PM Kisan Samman Nidhi! | ई-केवायसी न केल्याचा फटका; ९४ हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीला मुकणार!

ई-केवायसी न केल्याचा फटका; ९४ हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीला मुकणार!

अतिवृष्टीसह अन्य योजनांच्या लाभापासूनही राहणार वंचित

अतिवृष्टीसह अन्य योजनांच्या लाभापासूनही राहणार वंचित

शेअर :

Join us
Join usNext

ई-केवायसी न केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ९४ हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दरम्यान, ई-केवायसी न केल्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणा किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ ही या शेतकऱ्यांना मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती आहे.

दुसरीकडे ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय या शेतकऱ्यांची लाभाची रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने ई-केवायसी करावी, असे आवाहनच त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ४२ हजार ८२४ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे.

यातील ८ लाख २४ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या माहितीला मंजुरीही देण्यात आली आहे. दरम्यान, २ लाख ३६ हजार २७७ शेतकऱ्यांची माहिती अद्यापही अपलोड करणे बाकी आहे. दुसरीकडे विविध योजनेंतर्गत ७ लाख १६ हजार ८३९ शेतकऱ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले आहे.

मात्र, ९४ हजार ६२८ शेतकऱ्यांची ई- केवायसी प्रलंबित असल्यामुळे त्यांना लाभाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई- केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून विविध योजनेत दिली जाणारी मदत, अनुदान ई-केवायसी प्रलंबित असल्याने ती मिळण्यास अडचण जाते. शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

ई- केवायसीअभावी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय व तालुक्यातील कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तीचीही मिळाली नाही मदत

ई-केवायसी न केलेल्या जिल्ह्यातील ८० हजार ७०० शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचीही रक्कम मिळालेली नाही. गेल्या ३ वर्षात जिल्ह्यात ६८० कोटी रुपयांचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे झाले होते.

तालुकानिहाय ई-केवायसी प्रलंबित असलेले शेतकरी

चिखली - १७,५०७

लोणार - ११,४६३

बुलढाणा - १०,४५४

मेहकर - १०,६३७

दे. राजा - ७,८९४

सी.राजा - ७,४५५

संग्रामपूर - ६,५०२

नांदुरा - ६,२७१

जळगावला जा. - ५,८९७

मलकापूर - ३,५११

शेगाव - २,७७२

मोताळा - २,४९३

खामगाव - १,७७२

हेही वाचा - Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत

Web Title: Impact of not doing e-KYC; 94 thousand farmers will miss the PM Kisan Samman Nidhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.