Join us

डाळींची आयात सहा महिन्यांत १५ लाख टनांवर

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 30, 2023 8:10 PM

२०२३-२४ या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नैऋत्य मोसमी पावसाची अनियमितता आणि सरासरीहून कमी झालेला पाऊस याचा एकत्रित परिणाम यंदा डाळींच्या उत्पादनावर झाला आहे. यंदा २०२३-२४ या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १११ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या भारत त्याच्या वापराच्या १५ टक्के डाळी आयात करतो. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तूलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात १५ लाख टन डाळींची आयात करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी ही आयात ७.०९ लाख टन एवढीच होती.

नाबार्डच्या एका शोधनिबंधात भारत २०३०- ३१ पर्यंत मोठ्या प्रमाणात डाळी आणि तेलबियांची आयात सुरू ठेवेल. डाळींच्या मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आहे,असे यात सांगण्यात आले आहे.

खाद्यतेलाची आयात वाढविल्याने साेयाबीन उत्पादकांची गळचेपी

मसूर डाळीची अयातीत वाढ

परदेशातून मसूर, तूर, उडीद आणि इतर डाळींची खरेदी झाल्यामुळे आयातीत वाढ नोंदवण्यात आली आहे.२०२३ ते २४ या आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत मसूर डाळीच्या आयातीत १८४ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. अलिकडेच अमेरिकेतून आयात होणाऱ्या मसूरीवरील सीमाशुल्क हटवण्यात आल्याने चालू वर्षात मसूरची आयात दहा लाख टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता बळावली आहे. या रब्बी हंगामात २४ नोव्हेंबरपर्यंत १२.७४ लाख हेक्टरवर मसूरची आयात करण्यात आली. 

तूरीची आयात २.७४ लाख टन

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत २.७४ लाख टन तूर आयात करण्यात आली आहे. जी गेल्या आर्थिक वर्षीच्या तूलनेत ७५ टक्के अधिक आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

जानेवारी ते मार्च दरम्यान तुरीच्या संभाव्य किंमती काय असतील? जाणून घ्या

तुरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात कोटा मर्यादित ठेवलेला आहे. विदेशी व्यापार महासंचालनालय (DGFI) ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार तुरीसाठीचे - मुक्त आयात धोरण मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आले आहे.

टॅग्स :बाजारमार्केट यार्ड