Lokmat Agro >शेतशिवार > इस्त्रायलचे तिकीट बुक केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ॲग्रीटेक प्रदर्शन पुढे ढकलले

इस्त्रायलचे तिकीट बुक केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ॲग्रीटेक प्रदर्शन पुढे ढकलले

Important news for farmers who have booked tickets to Israel; Agritech exhibition postponed | इस्त्रायलचे तिकीट बुक केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ॲग्रीटेक प्रदर्शन पुढे ढकलले

इस्त्रायलचे तिकीट बुक केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ॲग्रीटेक प्रदर्शन पुढे ढकलले

सुरक्षा परिस्थिती आणि इस्रायलमधील युद्धामुळे, तेल अवीव येथे १७ ते १९ ऑक्टोबर रोजी होणारी अॅग्रीटेक कृषि शिखर परिषद आणि प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. असा संदेश मुंबईस्थित इस्रायल दूतावास कार्यालयाकडून मिळाला आहे.

सुरक्षा परिस्थिती आणि इस्रायलमधील युद्धामुळे, तेल अवीव येथे १७ ते १९ ऑक्टोबर रोजी होणारी अॅग्रीटेक कृषि शिखर परिषद आणि प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. असा संदेश मुंबईस्थित इस्रायल दूतावास कार्यालयाकडून मिळाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सुरक्षा परिस्थिती आणि इस्रायलमधील युद्धामुळे, तेल अवीव येथे १७ ते १९ ऑक्टोबर रोजी होणारी अॅग्रीटेक कृषि शिखर परिषद आणि प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन तारखेबाबत अधिसूचना स्वतंत्रपणे पाठवली जाईल. कार्यक्रमासाठी नोंदणी केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि इस्रायल आणि जगात शांतता नांदावी अशी अशा करतो. असा संदेश मुंबईस्थित इस्रायल दूतावास कार्यालयाकडून मिळाला आहे.

इस्रायलमधील अॅग्रीटेक कृषि प्रदर्शन बद्दल
इस्रायल आपल्या कृषी तंत्रज्ञानाची इतर देशांबरोबर देवाणघेवाण करण्यास उत्सुक असतो. खासकरून विकसनशील देशातील शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी इस्रायलमध्ये अनेक प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येऊन त्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. याखेरीज ॲग्रीटेक हे कृषी प्रदर्शन व परिषद दर ३ वर्षांनी आयोजित करण्यात येत असून त्यासाठी जगभरातून तसेच महाराष्ट्रारातून कृषी तज्ञ व शेतकरी इस्राईलला भेट देतात. यात प्रामुख्याने अत्याधुनिक कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन ज्यामध्ये ३००० चौमी क्षेत्राावर जगभरातील आघाडीच्या जागतिक कंपन्या आणि ५० कृषीटेक, फूडटेक स्टार्टअप तसेच नविन कृषीतील प्रयोगांचे प्रदर्शन पाहायला मिळते. तसेच इस्रायलच्या शेतीत नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरले जाते याची प्रात्याक्षिके पाहायला मिळतात. तसेच इस्रायल मधील कृषि क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या संस्था, कंपन्या, शेतकरी डेअरी फार्म यांना क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते.

Web Title: Important news for farmers who have booked tickets to Israel; Agritech exhibition postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.