Join us

नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ अवेळी पाऊस व गारपीट नुकसानाकरिता शेतकऱ्यांना मिळणार नवीन दराने मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 9:31 AM

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

अधिक वाचा: फॅट काढण्यासाठी जादा दूध घेणाऱ्या संस्थांवर होणार कारवाई

मात्र नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मधील अवेळी पाऊसगारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊसगारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली होती.

नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या महिन्यात अवेळी पाऊसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त, नागपूर, कोकण, अमरावती, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. तसेच यापूर्वी १० जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता १४४ कोटी निधी वितरणास मान्यता दिली असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

नोव्हेंबर व डिसेंबर, 2023 मध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील

अ. क्र.जिल्हा बाधित क्षेत्र – हेक्टरबाधित शेतकरी संख्यानिधी (रु. लक्ष)
1गोंदिया12244.12282422054.49
एकूण 12244.12282422054.49

विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.20.01.2024 चा प्रस्ताव

1नागपूर13479.93179363268.39
2वर्धा8.40171.23
3भंडारा8607.93208212318.75
4गोंदिया13417.96250543620.88
5चंद्रपूर19694.04396882678.38
एकूण 55208.26   10351611887.63

विभागीय आयुक्त, कोकण यांचा दि.23.01.2024 चा प्रस्ताव

1ठाणे157.7272633.40
2पालघर1677.677397260.05
3रायगड1191.234560163.04
4रत्नागिरी87.9236511.96
5सिंदूधुर्ग114.1463516.64
एकूण 3228.6813683.00485.09

विभागीय आयुक्त, अमरावती यांचा दि.20.01.2024 चा प्रस्ताव

1अमरावती206265.8632294435795.46
2अकोला189681.6824618833296.96
3यवतमाळ36545.00844516935.25
4बुलढाणा157180.9027657522034.77
5वाशिम60250.9520385711526.63
एकूण 649924.391134015109589.07

विभागीय आयुक्त, पुणे यांचा दि.17.1.2024 चा प्रस्ताव

1पुणे7863.91197271815.96
2`सातारा80.6318225.64
3सांगली16277.89315495811.23
4सोलापूर30660.92414588248.17
5कोल्हापूर16.18712.33
एकूण 54899.539298715903.33

विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचा दि.20.1.2024 चा प्रस्ताव

1छत्रपती संभाजीनगर148368.4126419420600.58
2जालना123091.8720721619176.93
3परभणी95053.6723178713080.59
4हिंगोली123164.4025762516786.65
5नांदेड3758.503922880.26
6बीड9.90172.19
7लातूर262.8988835.91
8धाराशिव1208.661912429.30
एकूण 494918.3096756170992.41
टॅग्स :शेतकरीशेतीगारपीटपाऊसराज्य सरकारसरकारपीक