Lokmat Agro >शेतशिवार > सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोनच विषयांवर सहा तास चर्चा

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोनच विषयांवर सहा तास चर्चा

In the Annual General Meeting of Someshwar Cooperative Sugar Factory, six hours of discussion on only two topics | सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोनच विषयांवर सहा तास चर्चा

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोनच विषयांवर सहा तास चर्चा

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत वृत्तांत वाचून अहवाल ताळेबंद नफा- तोटा पत्रके स्वीकारणे या दोनच विषयांवर सहा तास चर्चा झाली. एकूण सहा विषय सभेने २६ सप्टेंबरला मंजूर केले. डिस्टलरी विस्तारवाढ व उर्वरित पाच विषयावर रात्री उशिरापर्यंत चर्चा होती.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत वृत्तांत वाचून अहवाल ताळेबंद नफा- तोटा पत्रके स्वीकारणे या दोनच विषयांवर सहा तास चर्चा झाली. एकूण सहा विषय सभेने २६ सप्टेंबरला मंजूर केले. डिस्टलरी विस्तारवाढ व उर्वरित पाच विषयावर रात्री उशिरापर्यंत चर्चा होती.

शेअर :

Join us
Join usNext

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत वृत्तांत वाचून अहवाल ताळेबंद नफा- तोटा पत्रके स्वीकारणे या दोनच विषयांवर सहा तास चर्चा झाली. एकूण सहा विषय सभेने २६ सप्टेंबरला मंजूर केले. डिस्टलरी विस्तारवाढ व उर्वरित पाच विषयावर रात्री उशिरापर्यंत चर्चा होती. अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम जगताप होते. यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.

यावेळी सुदाम इंगळे, सतीश खोमणे, नंदकुमार जगताप, लक्ष्मण चव्हाण, प्रमोद काकडे, दिलीप खैरे, दिलीप फरांदे, विजयकुमार सोरटे, दत्ताजी चव्हाण, पी. के. जगताप, विक्रम भोसले, राजेंद्र जगताप, सुनील भोसले, प्रवीण भोसले, कौस्तुभ चव्हाण, सिद्धार्थ गीते, नामदेवराव शिंगटे, नंदकुमार शिंदे उपस्थित होते. ऊस दराच्या चढ- उतारावरून सभासदांनी उपस्थित केलेल्या मतांवर अध्यक्ष जगताप यांनी खुलासा केला.

पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, विस्तारवाढ करत असताना पाच हजार मेट्रिक टनाचा कारखाना साडेसात हजार टन झाला. यासाठी ७० कोटी खर्च आला. ४९ कोटी जिल्हा बँक व २४ कोटी स्वनिधी उभारण्यात आला. यासाठी दोनशे रुपये ठेव ठेवली. प्रकल्पासाठी स्वनिधी कुठून आणायचा. वाढाव्यातून १५ कोटी ठेव विमोचन निधी परत ठेवतो. त्याची तरतूद म्हणून हे पैसे ठेवले. नफ्यातून दीड कोटी टॅक्स भरावा लागतो. कोजनचा ११५ कोटी रुपयांचा प्रकल्प उभा राहिला आहे. सभागृहाची दिशाभूल करू नये.

सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर

प्रकल्पातील उत्पादनांचे मूल्यांकन एएस २ पद्धतीप्रमाणे केले आहे. ३५८३ रुपये उत्पादन आणि मूल्यांकन ३४८९ रूपये आहे. दरासाठी हे मूल्यांकन केले नाही. स्टलरी व कोजन बंद केल्याने २७ कोटी रुपये नफा कमी दिसतो. राजेंद्र जगताप, मदन काकडे यांनी विविध प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

हेही वाचा : Sugarcane FRP : एफआरपीचे ७२ कोटी राज्यातील 'या' १२ कारखान्यांकडे थकीत

Web Title: In the Annual General Meeting of Someshwar Cooperative Sugar Factory, six hours of discussion on only two topics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.