Lokmat Agro >शेतशिवार > येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज, ४००० हेक्टरवर सौरऊर्जा प्रकल्प

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज, ४००० हेक्टरवर सौरऊर्जा प्रकल्प

In the coming Kharif season, farmers will get daytime electricity, solar power project on 4000 hectares | येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज, ४००० हेक्टरवर सौरऊर्जा प्रकल्प

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज, ४००० हेक्टरवर सौरऊर्जा प्रकल्प

जळगाव ठरले अव्वल

जळगाव ठरले अव्वल

शेअर :

Join us
Join usNext

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीत राज्यात जळगावने आघाडी घेतली असून तब्बल ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे. याठिकाणी लवकरच प्रतिदिन ८०० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होईल.

या प्रकल्पासाठी ४४०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते. डिसेंबरअखेर महसूल प्रशासनाने ३,९५० हेक्टर कंपनीकडे सुपूर्द केले आहे. प्रकल्प उभारणीचे कंत्राटही देण्यात आले आहे.

संबंधित वृत्त: शेतकऱ्यांची होणार साेय, मराठवाड्यातील या गावांना आता होणार दिवसाही वीजपुरवठा

सध्या शेतीला रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर, शेतीला दिवसा किमान आठ तास वीज देण्यासाठी सरकारने यानिमित्ताने शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठीची मोठी अडचण आता दूर होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेची सुरुवात केली.

जळगाव ठरले अव्वल

महसूल प्रशासनाने १५ तालुक्यांतील १४० वीज उपकेंद्रांच्या मदतीने ३९५० हेक्टर क्षेत्रावर वीजनिर्मिती करण्याची तयारी ठेवली आहे. वीज उपकेंद्राने निर्मिती केलेली वीज संचित करण्याची पुरेशी क्षमता आणि पुरेसा प्रकाश उपलब्ध होईल, यादृष्टीने या क्षेत्राचे संपादन केले आहे.

त्यामुळे प्रतिदिन ८०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे उद्दिष्ट गाठण्यात जळगावचे महसूल प्रशासन राज्यात अव्वल ठरले आहे. पुरेशा प्रकाशासह क्षमताशील वीज उपकेंद्रांजवळ असणारे गावठाण, शासकीय जमिनी या योजनेसाठी उपलब्ध करून दिली आहे. वीज वितरण कंपनीकरवी या प्रकल्पांना चालना मिळत आहे. येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे. त्यातून मानसिक व शारीरिक त्रासातून मुक्त्ती मिळणार आहे. - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव

मराठवाड्यातील या गावांनाही लाभ

या योजनेत केज मतदारसंघातील वाघेबाभूळगाव, मस्साजोग, उमरी, राजेगाव, नांदूरघाट, मांडवा पठाण, विडा, हनुमंत पिंपरी, बनसारोळा, माळेगाव, देवगाव या अकरा उपकेंद्रांचा समावेश आहे.

Web Title: In the coming Kharif season, farmers will get daytime electricity, solar power project on 4000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.