Lokmat Agro >शेतशिवार > Pomegranate डाळिंबात आमचा नाद नाय करायचा; निर्यातीत हा जिल्हा अग्रभागी

Pomegranate डाळिंबात आमचा नाद नाय करायचा; निर्यातीत हा जिल्हा अग्रभागी

In the pomegranate we are no 1 position; This district is leading in exports | Pomegranate डाळिंबात आमचा नाद नाय करायचा; निर्यातीत हा जिल्हा अग्रभागी

Pomegranate डाळिंबात आमचा नाद नाय करायचा; निर्यातीत हा जिल्हा अग्रभागी

देशभरात तसेच परदेशात चवीची व गुणवत्तेची म्हणून सोलापूर (महाराष्ट्र) डाळिंबाची ओळख आहे. मागील आठ-दहा वर्षांत तेल्या रोगावर उपचार करता करता डाळिंब उत्पादक परेशान झाले होते. तेल्या हाताबाहेर गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्र डाळिंब काढून टाकण्यात आले.

देशभरात तसेच परदेशात चवीची व गुणवत्तेची म्हणून सोलापूर (महाराष्ट्र) डाळिंबाची ओळख आहे. मागील आठ-दहा वर्षांत तेल्या रोगावर उपचार करता करता डाळिंब उत्पादक परेशान झाले होते. तेल्या हाताबाहेर गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्र डाळिंब काढून टाकण्यात आले.

शेअर :

Join us
Join usNext

अरुण बारसरकर
सोलापूर : एक-दोन वर्षे अतिपाऊस.. तर एखाद्या वर्षी पावसाची अत्यल्प हजेरी यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेती पिकांचे गणित बिघडत आहे. या परिस्थितीत खरीप व रब्बी हंगामातील पिके धोक्यात येत असताना बहुवार्षिक पिकात समावेश असणाऱ्या फळबागा तर उध्वस्थ होतात.

त्यातूनही जिल्ह्यात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र तग धरून आहे. डाळिंब निर्यातीत सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे. अतिशय कमी पाऊस व दुष्काळी पट्टा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. पावसाचे प्रमाण दरवर्षीच कमीअधिक होते.

मागील पाच वर्षाचा विचार केला असता अगोदर चार वर्षे संततधार, अतिवृष्टी तर मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. उन्हाळा कडक राहिल्याने फळबागांची मोठी हानी झाली. कमीअधिक पावसाचे चक्र सतत सुरू असल्याने वार्षिक पिकांची नव्याने लागवड होत असली तरी पाण्याअभावी क्षेत्रात घट होते.

त्यामुळे एक लाख हेक्टरपेक्षावर गेलेल्या क्षेत्रात घट झाली आहे. अशा परिस्थितीतही जिल्ह्यात सध्या ९५ हजार हेक्टर क्षेत्रात फळबागा आहेत.

तरीही डाळिंब टिकूनच..
- देशभरात तसेच परदेशात चवीची व गुणवत्तेची म्हणून सोलापूर (महाराष्ट्र) डाळिंबाची ओळख आहे. मागील आठ-दहा वर्षांत तेल्या रोगावर उपचार करता करता डाळिंब उत्पादक परेशान झाले होते. तेल्या हाताबाहेर गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्र डाळिंब काढून टाकण्यात आले. मागील दोन वर्षांत पिनहोल बोअरच्या प्रादुर्भावाने डाळिंब घायाळ झाले होते.
- कृषी खात्याकडील आकडेवारीवरून जिल्ह्यातील डाळिंबाचे सर्वाधिक ३४,५५० हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष असताना जिल्ह्यात अधिक पाण्याची गरज असलेल्या केळीची लागवड ६५२ हेक्टर क्षेत्रात झाली आहे. आंब्याचा गोडवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात मागील वर्षी आंब्याची ७८८ हेक्टरवर लागवड झाली आहे.

फळ - २३-२४ लागवड - एकूण
डाळिंब - ७८९ - ३४,५५०
द्राक्ष - ६९ - २०,४७०
केळी - ६५२ - २०,४७०
आंबा - ७८८ - १६,३८५
लिंबू - ७६ - ५,२०५
सीताफळ - १०६ - ५,१५८
पपई - - ३,२२४ -३.६९६
चिक्कू - २.४० - १,०६७
चिंच - - ३,१७

माझ्याकडे भगवा वाण चार एकर डाळिंब आहे. मागील दोन वर्षात पीन होल बोररर चा प्रादुर्भाव होता. असे वातावरण राहिले तर तेल्या उद्धभवतो. मात्र औषधाच्या पाण्याच्या फवारण्या सुरू ठेवाव्या लागतात. तीन-चार वर्षात १०० रुपयापेक्षा कमी भाव मिळतो. डाळिंबातुन चार पैसे मिळतात. - विवेक माने, बैरागवाडी, माढा

युरोपियन देशाला निर्यात होणाऱ्या मार्गात अडथळा आल्याने वाहतूक दूरवरून करावी लागते. त्यामुळे वाढणारा वाहतूक खर्च व युरोपियन देशात मिळणारा दर परवडत नाही. जिल्हात यावर्षी अडीच-तीन हजार एकर डाळिंब क्षेत्र वाढले आहे. दररोजचा पाऊस व ढगाळ वातावरणाचा परिणाम डाळिंबावर होणार आहे. - प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, राष्ट्रीय डाळिंब संघ

अधिक वाचा: Women Success Story शेतकऱ्यांसाठी झटणारी भारतातली पहिली महिला ड्रोन पायलटची कहाणी

Web Title: In the pomegranate we are no 1 position; This district is leading in exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.