Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील रब्बी क्षेत्रात हरभरा वाढला, ज्वारी घटली

राज्यातील रब्बी क्षेत्रात हरभरा वाढला, ज्वारी घटली

In the rabi area of the state gram increased, jowar decreased | राज्यातील रब्बी क्षेत्रात हरभरा वाढला, ज्वारी घटली

राज्यातील रब्बी क्षेत्रात हरभरा वाढला, ज्वारी घटली

राज्यात यंदा रब्बी हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. तर ज्वारीची पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही घट असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्यात यंदा रब्बी हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. तर ज्वारीची पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही घट असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात यंदा रब्बी हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. तर ज्वारीचीपेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही घट असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. राज्यातील रब्बीचे क्षेत्र सरासरी ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर आहे.

यंदा ४९ लाख ८ हजार २३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही पेरणी ९०.९६ टक्के आहे. गेल्या वर्षी ५४ लाख ६४ हजार ७१६ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही पेरणी ९० टक्के आहे. यंदा हरभऱ्याच्या लागवडीत वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू व हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. राज्यात हरभऱ्याचे सरासरी लागवड क्षेत्र २१ लाख ५२ हजार १४ हेक्टर इतके आहे. रब्बी पिकांमध्ये हे क्षेत्र सर्वाधिक आहे. अवकाळी पावसाचा फायदा हरभऱ्याच्या लागवडीला झाला असून यंदा २३ लाख २० हजार ८६० हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही लागवड १०८ टक्के आहे.

अधिक वाचा: हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह, प्लास्टिक कव्हर व मल्चिंगसाठी अनुदान; कसा कराल अर्ज?

हरभऱ्यानंतर ज्वारीचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. यंदा १३ लाख ७० हजार ८३० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या (१७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर) ही पेरणी ७८ टक्के तर गेल्या वर्षीच्या तुलनेत १०९ टक्के आहे.

पाणी पुरेसे नसल्याने आवर्तनाची शक्यता नाही
राज्यात यंदा अपुरा पाऊस झाला आहे. विहिरी, कूपनलिकांना पुरेसे पाणी नाही. धरणांमध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे रब्बी पिकांना पुरेसे आवर्तन मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या सरासरीच्या तुलनेत ९१ टक्केच झाल्या आहेत. गेल्या वर्षी सुमारे ७० हजार हेक्टर जादा क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या.

पिके क्षेत्रटक्के (सरासरीच्या तुलनेत)गेल्या वर्षीच्या तुलनेत
ज्वारी१,३७,०८०७८.१९१०९
गहू७९५५४६७५.८५८०
मका२६१९५९१०१.४१८१
हरभरा२३२०८६०१०७.८५८६
एकूण४९०८२३८९०.९४९०

अवकाळी पावसामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ झाली आहे. मात्र, एकूणच परतीच्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने सरासरीच्या तुलनेत पेरण्या काहीशा कमी झाल्या आहेत. - दिलीप झेंडे, संचालक, विस्तार आणि प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे

Web Title: In the rabi area of the state gram increased, jowar decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.