Lokmat Agro >शेतशिवार > कापूस ग्रहणाच्या विळख्यात, संशोधनात दिरंगाई?

कापूस ग्रहणाच्या विळख्यात, संशोधनात दिरंगाई?

In the wake of the cotton eclipse, delay in research? | कापूस ग्रहणाच्या विळख्यात, संशोधनात दिरंगाई?

कापूस ग्रहणाच्या विळख्यात, संशोधनात दिरंगाई?

कशाने कमी झाली उत्पादकता?

कशाने कमी झाली उत्पादकता?

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या दशकभरापासून कपाशी पिकाला रोगराई, सततचा पाऊस, ढगाळ वातावरणासह ऐनवेळी मजुरांची टंचाई आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणाऱ्या कमी उत्पन्नाचे ग्रहण लागले आहे. २००२ मध्ये 'बीटी' बियाण्यांचा वापर वाढल्यापासूनच कापसावरील हे ग्रहण आहा सारा वाढले व विदर्भातील कापसाच्या पेऱ्याची अधोगती सुरू शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना त्यावर संशोधन करण्याची भूमिका निभावणारी कृषी विद्यापीठे हे पांढरा हत्ती ठरल्याने कापूस कोंडी सुटणार तरी कशी, असा प्रश्न आहे.

विदर्भात 'जेनेटिकली मॉडिफाइड' म्हणजेच जनुकीय बदल केला गेलेल्या 'बीटी कॉटन' बियाण्याचा वापर वाढत गेला. या बियाण्यांच्या वापराचे अनेक फायदे सांगितले गेले. कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांनीही बियाण्यांच्या वापराबाबत प्रोत्साहन दिले. अळ्या-कीटकांची प्रतिकार क्षमता या बियाण्यांमध्ये असल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशकांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले गेले. तसे सकारात्मक परिणामही दिसले. मात्र, २०१३-१४ पासून 'बीटी' बियाण्यांवरही अळी, बोंडअळी, शेंडे कातरणारी अळी व रोगराई पसरत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी महागडी कीटकनाशके शेतकऱ्यांना फवारावी लागत असून फवारणीचा खर्च वाढतच असल्याने शेतकरी विदर्भातील या प्रमुख नगदी पिकाकडे पाठ फिरवीत आहेत.

कृषी विद्यापीठांकडून संशोधन होण्याची गरज 

  • शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी संकल्पना कृतीत उतरवताना कृषी विद्यापीठे, शासकीय यंत्रणा, सहकारी निम-सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधण्यात येऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून नवीन वाण संशोधित केले जात असल्याची माहिती होती.
     
  • यापृष्ठभूमीवर कृषी विद्यापीठ व महाबीजमध्ये सामंजस्य करार झाल्याचीही चर्चा होती. असे असले तरी कृषी विद्यापीठांतर्गत कापूस संशोधन केंद्राच्या माध्यमातून संशोधित करण्यात येत असलेले नवीन वाण प्रत्यक्ष वाण संशोधित होत असल्याची माहिती होती.
  • शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यास मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे. तथापि नवीन संशोधित वाणाव्दारे केवळ उत्पादकता वाढीवरच भर दिला गेला असल्याने पूर्वानुभव पाहता कीड व रोगराईबाबतही संशोधनाची गरज आहे.
     

उत्पादकता कमी होण्याची कारणे

■ अलीकडील काळात बीजी-२ या वाणाच्या बियाण्यांचा वापर केला जात आहे. मात्र, अपेक्षित उत्पादन मिळेनासे झाले आहे. हलक्या जमिनीत कापसाची लागवड, सुधारित तंत्राच्या वापराचा अभाव, खतांचे अपुरे व अयोग्य व्यवस्थापन, प्रतिएकरी कमी रोपांची संख्या, सिंचनाचा अभाव, नैसर्गिक अनिश्चितता

केवळ प्रोत्साहन प्रयत्न का नाही?

■ आधुनिक तंत्र व सुधारित वाणांच्या बियाण्यांची निवड करून शेतकऱ्यांनी समृध्दी साधावी, असे बोलले जात असले तरी आधुनिक शेती व बियाण्यांमध्ये कालानुरूप व योग्यवेळी संशोधन न होणे, हीच मोठी शोकांतिका असल्याने अनेक शेतकरी पारंपरिक शेतीकडे वळत असून सेंद्रिय व देशी बियाण्यांनाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

Web Title: In the wake of the cotton eclipse, delay in research?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.