Lokmat Agro >शेतशिवार > यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर

यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर

In this year's sugarcane season, the factory has given a final sugarcane price of Rs. 3200 | यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर

यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर तीन हजार २०० रुपये प्रति मे. टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर तीन हजार २०० रुपये प्रति मे. टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

शेअर :

Join us
Join usNext

अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर तीन हजार २०० रुपये प्रति मे. टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

अध्यक्ष सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३- २४ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ९ हजार ४६८ मे. टन उसासाठी कारखान्याने एफ.आर.पी. नुसार रु. २७९०.१० प्रति मे. टन दर येत असतानाही यापूर्वी रु. २९५० प्रति मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३२७ कोटी २९ लाख ३० हजार एकरकमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली आहे.

याशिवाय १.८३ लाख मे. टन खोडवा उसासाठी १०० रुपये प्र.मे.टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली आहे. ऊस तोडणी व वाहतूक दरामध्ये झालेल्या वाढीमुळे ऊस तोडणी व वाहतूक खर्चात रु. १३७ प्रती मे. टन वाढ होऊनही रु. ३२०० प्रति मे. टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे.

अंतिम हप्त्याची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळी सणापूर्वी वर्ग करण्यात येणार आहे. भीमाशंकर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर दिलेला असून यापुढेही ही परंपरा कायम राहील.

तरी गाळप हंगाम २०२४-२५ करिता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवण्याचे आवाहन उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

Web Title: In this year's sugarcane season, the factory has given a final sugarcane price of Rs. 3200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.