Join us

अखेर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण! १०० गावांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 5:27 PM

मागच्या अनेक वर्षांपासून बहुतर्चीत असलेल्या या कालव्यातून  १९१ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पहिल्या आणि डाव्या कालव्याचे अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करून लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेला आणि मागच्या अनेक वर्षांपासून बहुतर्चीत असलेल्या या प्रकल्पाच्या कालव्यातून  १९१ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.  यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.

प्रवरा नदीवर असलेल्या अकोले तालुक्यातील निळवंडे धरणावरील कालव्याचा प्रकल्प मागच्या अनेक वर्षांपासून रखडला होता. ८५ किलोमीटरचा डावा कालवा आणि ९७ किलोमीटरचा उजवा कालवा असे दोन कालवे या धरणावर बांधण्यात आले आहेत. उजव्या कालव्याचे काम अजून पूर्ण झाले नाही. धरणाच्या मंजुरूनंतर तब्बल ५२ वर्षांनी या कालव्यातून पाणी वाहू लागल्याने शेतकरी आनंदात आहेत. 

या कालव्यातील पाणी बंद पाईपलाईनद्वारे वेगवेगळ्या पाणी योजनांना पुरवले जाणार असून यामुळे हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. लाभक्षेत्रातील ११३ पेक्षा जास्त गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. 

दोन्ही कालव्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर,अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यातील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील या पाच तालुक्यांतील जवळपास १७६ गावांतील ६६ हजार २६६ हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीधरणनरेंद्र मोदीशिर्डीशेतकरी आंदोलन