सततच्या व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान जमा केले जात आहे; परंतु बीड जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ४५८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने त्यांचे १४५ कोटी ५६ रुपये वाटपाअभावी थांबलेले आहेत. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यावरच त्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार आहे.
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सततचा पाऊस झाला होता. परिणामी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कृषी सहायक, तलाठी यांनी पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी विभागीय आयुक्तांना पाठवली होती. पुढे, चालू वर्षात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळेही पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान, अतिवृष्टीचे अनुदान जिल्हास्तरावरून देण्याऐवजी राज्य शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे.
ई-केवायसी गरजेची
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसीलस्तरावरून याद्या मागविल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या याद्या पुढे शासनाकडील सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केल्या जातात; परंतु बँक करण्यासाठी शेतकऱ्याची ई- खात्यावर अनुदान जमा केवायसी असणे बंधनकारक आहे. आता अनुदान वाटपाची वेळ आली आहे; परंतु अनेक शेतकयांनी ई-केवायसी केली परळी नसल्याने त्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होण्यास विलंब होत आहे. इ केवायसी झाल्यानंतरच बँकेत अनुदान जमा होणार आहे.
अनुदान प्राप्त करण्यासाठी ई- केवायसी बंधनकारक आहे. तलाठ्यांनी डेटा अपलोड केलेला आहे. शेतकयांनी व्हीके नंबर घेऊन ई-केवायसी करून घ्यावी.- शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड
ज्यांचे ई-केवायसी झालेले आहे त्यांचे नाव यादीत नाही. मात्र, ज्या शेतकयाच्या नावापुढे व्हिके नंबर पडला आहे त्यांनाच ई-केवायसी करून घ्यायची आहे. ज्यांची ई-केवायसी राहिले आहे त्यांनी ती करून घ्यावी. -सुरेंद्र डोके, तहसीलदार, बीड
यापूर्वीही दिल्या होत्या सूचना
शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ई-केवायसी करुन घ्यावे, यासाठी मागच्या दोन महिन्यांत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत; परंतु शेतकरी अद्यापही ई-केवायसी करण्यात पुढे येत नसल्यामुळे किवा त्यांना याची माहिती नसल्यामुळे पावणेतीन लाख शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांनो, तलाठ्याशी संपर्क साधा !
1) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी राज्य शासनाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. अनुदान देण्यासाठी तहसीलदारांकडून त्या-त्या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकयांच्या याद्या मागविल्या जात आहेत. प्रत्येक शेतकन्यास एक व्हिके क्रमांक अर्थात विशिष्ट क्रमांक दिला आहे.
2) व्हिके लिस्ट व अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांकडे उपलब्ध आहे. ज्यांना अनुदान मिळाले नाही त्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन खाते अॅक्टिव्ह आहे की नाही हे तपासावे. त्यानंतर ज्यांना अनुदान मिळाले नाही त्यांनी तलाठ्याकडून आपला विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घ्यावी.
3) ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक व विशिष्ट क्रमांक शेतकऱ्यांनी घेऊन जावे. ई-केवायसी निःशुल्क आहे, तसेच शेतकऱ्यांची बँक खाते हे आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. त्या शिवाय अनुदान मिळणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.