Join us

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञांची केव्हीके बदनापूरला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 9:24 PM

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) शास्त्रज्ञांनी बुधवारी (दि. २८) रोजी कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बदनापूर येथे भेट दिली.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) शास्त्रज्ञांनी बुधवारी (दि. २८) रोजी कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बदनापूर येथे भेट दिली. यावेळी भा.कृ.अनु.प. चे केंद्रिय कापुस संशोधन संस्था नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील महाजन आणि डॉ. व्ही. एस. नगरारे यांनी कृषी विज्ञान केंद्र बदनापूरच्या विविध कृषी विस्तार उपक्रमांची पाहणी केली व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान केव्हिके बदनापूर येथील विविध संशोधन प्रकल्प, प्रयोगशाळा, शेती प्रदर्शन क्षेत्र आणि इतर सुविधांची तपासणी केली. तसेच केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर च्या सहाय्याने केव्हीके बदनापूर द्वारे राबविण्यात येणारे विशेष कापुस प्रकल्प अंतर्गत आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी झालेल्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना कापुस पिकातील सघन व अतिघन लागवड तंत्रज्ञान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास मागच्या वर्षी ज्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी सदरील तंत्रज्ञानाचा कापुस पिकात वापर करून विक्रमी उत्पादन घेतले आहेत आणि कृषी विस्ताराचे भरीव कामगिरी बद्दल जयकिसन शिंदे, अजिंक्य सिनगारे आणि अशोक शीरसाठ यांचे शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सदरील एक दिवसीय कार्यशाळेत एकात्मिक कापुस लागवड व्यवस्थापन पुस्तिका आणि दादालाड सघन लागवड प्रणाली चे भित्तीपत्रिके चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

भा.कृ.अनु.प.,नवी दिल्ली द्वारे भारतातील ७३० हुन अधिक कृषी विज्ञान केंद्रांना भेटी देऊन सदरील केव्हिके चे कृषी विस्तारातील योगदान आणि विविध उपक्रम बाबत माहिती घेतली जात आहे. केव्हिके द्वारे शेतकऱ्यांना दिले जाणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शनातून दिले जाणारे मार्गदर्शन याविषयी सविस्तर माहिती घेतली.

सदरील भेटी दरम्यान डॉ. एस. डी. सोमवंशी, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख यांनी मागील पाच वर्षांतील केव्हिके, बदनापूर चा प्रगती अहवालाचे सादरीकरण केले. 

या भेटीदरम्यान केव्हिके, बदनापूर येथील अधिकारी, कर्मचारी व पंचक्रोशीतील काही प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते तसेच म्हयको बिज कंपनीचे श्री. अजय गायकवाड आणि नुजीवुडु बियाणे कंपनी तर्फे बाबु अंधारे उपस्थित होते. सदरील भेटीमुळे केव्हीके बदनापूर आणि भा.कृ.अनु.प.,नवी दिल्ली यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठबदनापूरजालनाजालना