सर्वदूर चव पेरणाऱ्या जळगावच्या भरताच्या वांग्यांच्या हंगामावर यंदा अवकाळीसह थंडीचे संकट आले आहे. त्यामुळे किलोला ४०-५० रुपये किलो या भावाने मिळणारी वांगी आता शंभरीपार करून बसली आहेत. त्यामुळे शेतशिवारांतील 'भरीत पार्टी'लाही महागाईची हुडहुडी भरली आहे.
चंपाषष्ठीनंतर दर्जेदार आणि स्वादिष्ट वांग्यांचे उत्पादन सुरू होते, हा अनेकांचा समज आहे. गत सोमवारच्या चंपाषष्ठीला वांगी खरेदीसाठी असंख्य ग्राहकांनी 'मुहूर्त' साधला. आवक कमी आणि मागणी जळगाव शहरात ठिकठिकाणी विक्रीसाठी येत असलेली हिरवीगार भरीताची वांगी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पुणे, मुंबई, नाशिक शहरातून मागणी
- पुणे, मुंबई व नाशिक या शहरांमधून वांगी मोठ्या प्रमाणावर मागविली जातात.
- खान्देशातील शेतकरी या मोठ्या शहरांमधील बाजारांत वांगी पाठविण्याला प्राधान्य देत आहेत. दर्जेदार मालाला समाधानकारक भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
- जास्त असल्याने सोमवारी दर्जेदार वांगी दीडशे रुपये प्रतिकिलो या दराने विकली गेली.
चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर वांगे शंभरीपार, टोमॅटो गडगडला; इतर भाजीपाल्याचे भाव स्थीर
कांदा, लसनाच्या पातीलाही आला भाव
वांग्याचे भरीत बनविताना त्यात कांद्याच्या पातीचा समावेश करण्यात येतो. त्यामुळे कांद्याच्या पातीचीही मागणी वाढली आहे. त्या तुलनेत मात्र आवक कमी असल्यामुळे चांगला भाव आला होता. एका जुडीसाठी १५ ते २० रुपये भाव मिळाला.