हिंगोली येथील मोंढ्यात १९ डिसेंबर रोजी एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांदरम्यान भाव मिळाला. सध्या मिळणारा भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे.
यंदा अत्यल्प पावसामुळे सोयाबीनला फटका बसला. त्यातच ऐन बहरात असताना येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत किमान ६ हजार रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, पाच हजारांवर भाव जात नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात हळद व सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. १९ डिसेंबर रोजी सोयाबीनच्या ४ कट्ट्यांची आवक झाली. मंगळवारी झालेल्या बिटामध्ये सोयाबीनला ४८०० रुपयांचा दर मिळाला आहे. हळदीच्या दरात थोडीफार तेजी आली आहे. मात्र सोयाबीनचे दर काही वाढत नाहीत. गतवर्षी सोयाबीनचे दर वाढले होते. त्याप्रमाणे पुन्हा सोयाबीनचे दर वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
गहू ९० तर ज्वारी ८ क्विंटल विक्रीला मंगळवारी मोड्यात ९० क्विंटल गहू तर ८ क्चिटल ज्वारी विक्रीसाठी आली होती. गव्हाला सरासरी २ हजार ४५५ तर ज्वारीला २ हजार ८१७ रुपये भाव मिळाला. सध्या चांगल्या दर्जाच्या ज्वारीला समाधानकारक भाव मिळत आहे. ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव जात असून, खुल्या बाजारात एक क्चिटल ज्वारीसाठी ५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. ठेवले. १९ डिसेंबर रोजी मात्र सोयाबीनच्या दरात किंचित वाढ झाली आहे.
चारच दिवसांत पुन्हा भाव दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरून ४ हजार ते ४ हजार ७०० रुपयांवर आले होते. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना जास्तीतजास्त ५ हजारांचा भाव सोयाबीनला मिळाला, तर सरासरी ४ हजार ८०० रुपये भाव राहिला. यंदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे सध्या मिळणारा भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, भाववाढीची प्रतीक्षा आहे.
आज सोयाबीनला काय भाव मिळाला?
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|
लासलगाव - विंचूर | 575 | 3000 | 4736 | 4650 |
छत्रपती संभाजीनगर | 71 | 4500 | 4750 | 4660 |
सिल्लोड | 6 | 4700 | 4800 | 4800 |
लोहा | 74 | 4725 | 4871 | 4801 |
तुळजापूर | 275 | 4800 | 4800 | 4800 |
राहता | 18 | 4700 | 4751 | 4725 |
धुळे | 3 | 4245 | 4650 | 4505 |
सोलापूर | 44 | 4775 | 4815 | 4790 |
अमरावती | 5652 | 4500 | 4651 | 4575 |
चोपडा | 25 | 3500 | 4699 | 4699 |
राहूरी | 12 | 4500 | 4600 | 4550 |
हिंगोली | 660 | 4650 | 5008 | 4829 |