Lokmat Agro >शेतशिवार > खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात

खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात

Initiation of 'Har Ghar Khadi' initiative to promote Khadi and village industry products | खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात

खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात

खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा. खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ मध्ये होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे.

खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा. खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ मध्ये होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे.

शेअर :

Join us
Join usNext

खादीवर आधारित स्टार्टअप सुरु करावे, मुंबई येथे खादीवर आधारित ‘फॅशन शो’ चे आयोजन करावे, खादी ग्रामोद्योग उत्पादनांसाठी ई-व्यासपीठ सुरु करावे, तसेच खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा. खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ मध्ये होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे. तसेच उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कृती योजना आखावी, अशी सूचना त्यांनी मंडळाला केली.

आपल्या वाटचालीत खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मोठे योगदान आहे. आपण सलग तीन वर्षे खादी यात्रा काढली व खादीचा प्रचार प्रसार केला, अशी आठवण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव असले पाहिजे. त्यातून रोजगार निर्माण होतील, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. खादी व ग्रामोद्योग मंडळाने पुढील वर्षीपासून आपले स्वतंत्र पुरस्कार सुरु करावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

खादी हा देशाचा आत्मा आहे. खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात करीत असून प्रत्येकाने किमान एक तरी खादीची वस्तू घेतली, तर लोकांना रोजगार मिळेल, असे मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले.

खादी म्हणजे केवळ खादीचे वस्त्र नसून, ग्रामोद्योगातून तयार झालेल्या साबणापासून शाम्पू तेल व चपलेपर्यंत खादीची व्याप्ती आहे, असे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी सांगितले. खादी व ग्रामोद्योग मंडळ सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे व त्यातून लोकांच्या जीवनात परिवर्तन होत आहे असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी उद्योजक एकनाथ जाधव (यवतमाळ), अशोक साळवी (रत्नागिरी), अक्षय कोळप (सांगली), बाळोजी माळी (उस्मानाबाद), क्षमा धुरी (सावंतवाडी), अशोक गडे (जळगाव), हर्षदा वाहने (भंडारा), जितेंद्र परदेशी, मंगेश चिवटे, सिद्धेश चौधरी व जितेंद्र हरियान यांचा ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी मंडळाच्या ‘ग्रामोद्योग’ मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, ‘मेघाश्रेय फाउंडेशन’च्या अध्यक्षा सीमा सिंह  प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Initiation of 'Har Ghar Khadi' initiative to promote Khadi and village industry products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.